महाराष्ट्रातील खासदारांनी लोकसभेत मराठा आरक्षणावर भूमिका घ्यावी 

महाराष्ट्रातीलसर्व 48 खासदारांनी या विषयावर केंद्र सरकारला निर्णय घेण्याची विनंती केली पाहिजे. विशेषतः भाजप व शिवसेनेचे चाळीस खासदार आहेत. त्यांनी या विषयावर जोर लावल्यास सरकारला निर्णय घ्यावाच लागेल.
महाराष्ट्रातील खासदारांनी लोकसभेत मराठा आरक्षणावर भूमिका घ्यावी 

नाशिक : लोकसभेत महाराष्ट्राचे 48 खासदार आहेत. यातील सर्वाधीक 23 खासदार भारतीय जनता पार्टीचे आहेत. आरक्षणाचा विषयात केंद्र सरकार निर्णायक भूमिका घेऊन हा विषय लगेचच सोडवू शकते.

सर्व 48 खासदारांनी या विषयावर केंद्र सरकारला निर्णय घेण्याची विनंती केली पाहिजे. विशेषतः भाजप व शिवसेनेचे चाळीस खासदार आहेत. त्यांनी या विषयावर जोर लावल्यास सरकारला निर्णय घ्यावाच लागेल. त्यासाठी राज्यातील सर्व सत्तेचाळीस खासदारांना पत्र लिहणार आहे, असे राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या नेत्या आणि जिल्हा परिषद सदस्या आर्की. अमृता पवार यांनी सांगितले. 

अमृता पवार यांनी आज यासंदर्भात ट्वीट केले आहे. त्या म्हणाल्या, देशातील दुसऱ्या क्रमाकांच्या लोकसभेच्या 48 जागा महाराष्ट्रात आहेत. यामध्ये भाजपचे सर्वाधीक तेवीस खासदार आहेत. शिवसेनेचे सतरा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार, कॉंग्रेस, एमआयएम आणि अपक्ष असे तीघे आहेत. खासदाराने राजीनामा दिल्याने परभणीची जागा रिक्त आहे. आरक्षणाचा निर्णय केंद्र शासनाच्या धोरणात्मक बाबींशी निगडीत आहे. त्यात त्यांच्या भूमिकेला महत्व आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात जो खटला सादर करण्यात आला आहे, त्यात महत्वाची महाराष्ट्राला मदत करण्याची भूमिका घेऊन केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार मराठा समाजाला मदत करु शकते. राज्य शासनाने आरक्षण दिले आहे. ते टिकवायचे असेल तर केंद्र शासन धोरणात्मक भूमिका घेऊन सर्वोच्च न्यायालयात अपेक्षीत निर्णय होण्यात भूमिका पार पाडू शकते. त्यातून कोट्यावधी युवक-युवतींना शिक्षण, रोजगार व अन्य विषयांत दिलासा मिळेल. आज बहुतांश मराठा समाजाचे नेते रस्त्यावर उतरले आहेत. रोज आंदोलन होते आहे. आमदार, खासदार हे तर नागरिकांचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी नागरिकांच्या या भावना, समाजाची स्पंदने सभागृहात मांडली पाहिजे. सरकारला त्यावर निर्णय घेण्यास भाग पाडले पाहिजे. त्यासाठीच लोकांनी त्यांना संसदेत पाठविले आहे. आज महाराष्ट्रातील सर्व नागरिक, राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि समाज या प्रश्‍नावर अस्वस्थ आहे. अशा स्थितीत खासदारांनी पुढाकार घेऊन राजकीय पक्षांची भूमिका बाजुला ठेऊन एकदिलाने मराठा आरक्षणाचा विषय मांडावा. यासाठी आज सर्व खासदारांना पत्र पाठविणार आहे. 
... 
https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=ae86FeiIZH8AX_q-82h&_nc_ht=scontent-sin6-2.xx&oh=ae5dbb7f6f9195173bebabca908cca27&oe=5F8FE6A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com