All Mahajashtra MP should raise voice against Onion Issue | Sarkarnama

महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी कांदा प्रश्नावर आवाज उठवावा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

कांदा निर्यातबंदीने जिल्ह्यातील शेतकरी केंद्र शासनाच्या धोरणाने घायाळ झाला आहे. त्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहे. आजही ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व खासदारांनी या विरोधात आवाज उठवावा.

नाशिक : कांदा निर्यातबंदीने जिल्ह्यातील शेतकरी केंद्र शासनाच्या धोरणाने घायाळ झाला आहे. त्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहे. आजही ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व खासदारांनी या विरोधात आवाज उठवावा, अशी सूचना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. 

यासंदर्भात श्री. भुजबळ म्हणाले, केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली आहे. यातून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. कांदा उत्पादक हा गरीब शेतकरी आहे. त्याच्या हितासाठी महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्याने पिकवलेल्या पिकाची विक्री झालेली नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र आधीच अडचणीत आले आहे. इतर वस्तूंचे भाव वाढल्यास त्यांची निर्यात थांबवली जात नाही मग कांद्याच्या बाबतीत असे का होते, असा सवाल त्यांनी केला. 

शेतकऱ्याला दुप्पट भाव मिळायला हवा, असे प्रधानमंत्री सांगतात. त्यामुळे कांदा उत्पादकाला दुप्पट हमीभाव द्यावा व भाव कोसळल्यास त्यांना पैसे द्यावे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. निर्यातबंदीच्या निर्णयाबाबत समजताच आदरणीय खा. शरद पवार साहेबांशी चर्चा केली. पवार साहेबांनी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा की असून ते यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
...
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख