Agriculture Minister says Administration ready to fight Tod Attack | Sarkarnama

गुजरातमार्गे टोळधाड आल्यास, मुकाबल्यासाठी महाराष्ट्राचे ड्रोन सज्ज !

संपत देवगिरे
गुरुवार, 28 मे 2020

गुजरातमार्गे उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात टोळधाडीची शक्यता होती. तसे इनपुट असल्याने कृषी विभागाने त्याची पुर्ण तयारी करुन ठेवली होती. यासंदर्भात कालच मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. त्यात आम्ही ड्रोनची मागणी केली आहे. 

नाशिक : महाराष्ट्रात जून-जुलै दरम्यान गुजरातमार्गे उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात टोळधाडीची शक्यता होती. तसे इनपुट असल्याने कृषी विभागाने त्याची पुर्ण तयारी करुन ठेवली होती. यासंदर्भात कालच मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. त्यात आम्ही ड्रोनची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याला संमती दिल्याने गुजरातमार्गे टोळधाड आल्यास मुकाबल्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगीतले. 

कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले, की जागतिक आरोग्य संघटनेने कळविलेल्या माहितीनुसार जुन-जुलै महिन्यात गुजरातमार्गे नाशिक विभागात नंदुरबार जिल्ह्यात टोळधाड येईल असा इशारा होता. याआधारे कृषी प्रशासनाने सर्व तयारी केली होती. हे टोळ जीथे रात्री मुक्काम करतील तीथे त्यांचा नाश करण्यासाठी फवारायची किटकनाशके तयार ठेवली होती. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी जेव्हा विदर्भात टोळधाड आली, तेव्हा त्यावर अतिशय जलद उपाययोजना करण्यात आली. हीच किटकनाशके फवारणीसाठी वापरण्यात आली. दुपारी दिडला त्याचा संदेश मिळताच त्याच दिवशी रात्री तीन वाजेपर्यंत प्रशासन काम करीत होते. त्यामुळे टोळधाडीचा चांगला मुकाबला करता आला. 

श्री. भुसे म्हणाले, पुढच्या टप्प्यात गुजरातमार्गे नंदुरबारला टोळधाड येऊ शकते असा अंदाज आहे. कदाचीत तसे होणार देखील नाही. मात्र तसे झाल्यास त्याच्या प्रतिकारासाठी कृषी विभाग सज्ज आहे. प्रशासनाने नुकतीचय त्याबाबत चर्चा केली आहे. त्यात जी माहिती मिळाली, त्यानुसार उपाय व कार्यवाही केली जाईल. कालच यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. टोळधाड आल्यास ती नष्ट करण्यासाठी आम्ही औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर करण्याचा पर्याय निवडला आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी संमती दिली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात टोळधाडीबाबत कृषी विभागाचे प्रशासन सजग आहे.  
टोळधाड काय असते?
नुकतेच काही मरुन पडलेले टोळ उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आढळले होते. ही टोळधाडीची चिन्हे आहेत. जागतिक तापमानवाढीचा हा परिणाम असल्याचे तज्ञांचे मत आहे. असंतुलीत हवामानामुळे यो टाळांची प्रजजनशक्ती वीसपट वाढते. ते समुहाने प्रवास करतात. दिवसा ते उड्डान करतात आणि रात्री झाडावर शेतात मुक्काम करतात. यावेळी ते आपल्या वजनाएव्हढे दोन ग्रॅम पीक, पाला खातात.. मात्र त्यांची संख्या एक ते तीन दशलक्ष असल्याने ज्या भागात ते मुक्काम करतात, तेथील सर्व पीक नष्ट करतात.    
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख