कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले, `काही भागात ढगफुटी सारखा पाऊस झाला`  :

गेल्या काही दिवसांत परतीचा पाऊस नुकसान करीत आहगे. ढगफुटी सारखा पाऊस झाल्यामुळे शेत, शिवारात पाणी साचले आहे. काही शेतातील माती सुध्दा वाहून गेल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे.
कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले, `काही भागात ढगफुटी सारखा पाऊस झाला`  :

मालेगाव : गेल्या काही दिवसांत परतीचा पाऊस नुकसान करीत आहगे. ढगफुटी सारखा पाऊस झाल्यामुळे शेत, शिवारात पाणी साचले आहे. काही शेतातील माती सुध्दा वाहून गेल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. या प्रसंगात शासन शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले. 

लखमापूर (बागलाण) येथील विविध विकास कामांचे लोकार्पण कृषी मंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी  लखमापुर येथील विकासाची कामे ग्रामीण भागातील विकास कामांसाठी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी आदर्शवत ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

यावेळी ते म्हणाले, बागलाण तालुक्यातील प्रलंबीत प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव प्रयत्नशिल राहू. आजच्या भुमीपूजनासह लोकार्पण करण्यात आलेल्या विकास कामांसोबतच प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांनाही लवकरच मंजूरी मिळेल. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात काही ठिकाणी ढगफुटी सारखा पाऊस झाल्यामुळे शेत शिवारात पाणी साचले तर काही शेतातील माती सुध्दा वाहून गेल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून लवकरच त्यांना शासनामार्फत मदत दिली जाईल.

निसर्गाच्या अवकृपेमुळे सध्या शेतकरी अडचणीत असला तरी शासन बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतशिवाराचे पंचनामे कृषी विभागामार्फत करण्यात येत आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे, संबंधित विमा कंपनीकडे रितसर अर्ज दाखल करण्याचे काम शेतक-यांनी करावी. शेतकऱ्यांना सक्षम व समृध्द करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. 

शेतमालाची साठवणूक, त्यावर होणारी प्रक्रिया व उत्पादीत केलेला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत विक्री करण्यासाठी स्मार्ट योजना कृषी विभागाकडून प्रस्तावित करण्यात आली आहे. यासाठी गटशेतीसह शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचे आवाहन त्यांनी केले. शेतीसंदर्भात चांगल्या सूचना व संकल्पना स्वागतार्ह आहेत. स्थानिक पातळीवर कृषी विभाग त्यांचे संकलन करण्यात येईल.

यावेळी आमदार दिलीप बोरसे, जिल्हा परिषदेचे सदस्य यतीन पगार, माजी सदस्य प्रशांत बच्छाव, मधुकर देवरे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपसभापतील राघो नाना अहिरे, डॉ. शेषराव पाटील, गजेंद्र पाटील, शशी निकम, तहसिलदार जितेंद्र इंगळे, गट विकास अधिकारी पांडूरंग कोल्हे कृषी अधिकारी सुधाकर पवार आदी उपस्थित होते.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com