कृषिमंत्री दादा भुसेंकडून महामार्गावर भाजीविक्रेत्याची विचारपूस - Agriculture Minister Dada Bhuse meet street vegitable saler Farmer | Politics Marathi News - Sarkarnama

कृषिमंत्री दादा भुसेंकडून महामार्गावर भाजीविक्रेत्याची विचारपूस

सरकारनामा ब्युरो
रविवार, 6 सप्टेंबर 2020

मालेगावहून नाशिकला येतांना कृषीमंत्री दादा भुसे यांना कोकणगाव (ता. निफाड) येथे महामार्गालगत भाजीपाला विक्रेता दिसला. तेव्हा त्यांनी वाहने थांबवत त्या शेतक-याची विचारपूस करीत भावांबरोबरच सध्याच्या अडचणीची देखील माहिीत घेतली.

नाशिक : मालेगावहून नाशिकला येतांना कृषीमंत्री दादा भुसे यांना कोकणगाव (ता. निफाड) येथे महामार्गालगत भाजीपाला विक्रेता दिसला. तेव्हा त्यांनी वाहने थांबवत त्या शेतक-याची विचारपूस करीत भावांबरोबरच सध्याच्या अडचणीची देखील माहिीत घेतली. एरव्ही अनेक लोक विक्रेत्याकडे वितारपूस करीत भाजीपाला खरेदी न करताच जातात. तसाच हा प्रसंग होता फक्त थेट कृषीमंत्र्यांनीच चर्चा केल्याने शेतक-याला समाधानाबरोबरच परिसरात चर्चेचा विषय झाल्याचा आनंद मिळाला.

नाशिक- आग्रा महामार्गावर कोकणगाव येथे कृषीमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अचानक थांबलाय महामार्गाच्या कडेला भाजीपाला विकणाऱ्या वृद्ध विक्रेत्याची कृषिमंत्र्यांनी विचारपूस करत अडचणी जाणून घेतल्या. आपल्याकडे थेट कृषिमंत्रीच आल्याने भाजीपाला व्रिकेत्या शेतकऱ्यानेदेखील मंत्री भुसे यांच्याशी मनमोकळी चर्चा केली.  

कोकणगाव येथील वारकरी असलेले स्थानिक शेतकरी लक्ष्मण मोरे हे महामार्गालगत आपल्या शेतातील ताजा भाजीपाला विक्रीसाठी ठेवत असतात. शुक्रवारी कृषिमंत्री कामानिमित्त मालेगाववरून नाशिककडे येत होते. तेव्हा भाजीपाला विकत असल्याचे दिसताच ते भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्याकडे गेले. शेतीमालाची कोरोनाच्या महामारीत झालेली परवड व पिकलेला शेतीमाल विकताना येणाऱ्या समस्या, मिळणारा बाजारभाव याविषयी सविस्तर चर्चा केली. या वेळी शेतकऱ्यांच्या या उपक्रमाची त्यांनी प्रशंसाही केली. 
...

 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख