मालेगांवच्या यशाचे श्रेय कृषीमंत्री दादा भुसेंनी कोणाला दिले माहित आहे का?

मालेगाव शहरात प्रारंभीच कोरोनाचा मोठा फैलाव झाला. त्याबाबत सगळीकडून टिकेचा भडीमार होत होता. आम्ही मात्र त्या टिकेकडे लक्ष दिले नाही. आम्ही सर्वांनी हातात हात घालून, परस्पर समन्वय निर्माण केला.
मालेगांवच्या यशाचे श्रेय कृषीमंत्री दादा भुसेंनी कोणाला दिले माहित आहे का?


नाशिक : मालेगाव शहरात प्रारंभीच कोरोनाचा मोठा फैलाव झाला. त्याबाबत सगळीकडून टिकेचा भडीमार होत होता. आम्ही मात्र त्या टिकेकडे लक्ष दिले नाही. आम्ही सर्वांनी हातात हात घालून, परस्पर समन्वय निर्माण केला. चांगली टिम तयार केली. या टिमवर्कमुळे कोरोनाचा पराभव केला, असे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. 

श्री. भुसे म्हणाले, मालेगांवचे यश आज जगासमोर पॅटर्न म्हणून येतांना दिसत असले तरी त्यात जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, धार्मिक नेते व लोकप्रतिनिधी सर्वांचाच सहभाग आहे. सर्वांनी एकजुटीने केलेल्या कामाचे फलित म्हणजे आज मालेगांवची कमी झालेली रुग्णसंख्या आहे.

श्री भुसे यांनी मालेगाव शहरात कोरोना संदर्भात झालेल्या कामकाजाची माहिती दिली.यावेळी त्यांनी सांगितले, की जनतेच्या मनातील भिती दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी लागणार आहे. मालेगांवच्या यशाने हुरळून न जाता सावध पावले उचलण्याची गरज आहे. कोरोनाचा संसर्ग झालेली रुग्णसंख्या शुन्यावर येईपर्यंत एकजुटीने टिमवर्क म्हणून काम करावे लागणार आहे. प्रत्येक गल्ली आणि वस्त्यांमध्ये छोट्या प्रमाणावर क्लिनिक चालविणाऱ्या डॉक्टरांना विश्वासात घेऊन स्थानिक पातळीवरच उपचार कसे करता येतील त्यासाठी भविष्यात जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे. छोट्या डॉक्टरांना दिलेले बळ व त्यातून निर्माण झालेली सुस्थिती आज आपण मालेगांवात पाहत आहोत. त्याचबरोबर नॉन कोविड पेशंटचे हाल होणार नाहीत त्यासाठीचेही नियोजन व व्यवस्था करणे गरजेचे आहे असे यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
....

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=2xNy2aVta-EAX_QYTy5&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=92cd29a553374568fcda1c8f8c3d0b0e&oe=5F40CCA7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com