शेतकऱ्यांना सक्षम, समृध्दीसाठी कृषी विभाग सक्षम ! - Agriculture Department capable to Selfsuficiant Farmers | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांना सक्षम, समृध्दीसाठी कृषी विभाग सक्षम !

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

कोवीड-19 च्या प्रादुर्भावामुळे राज्यासह संपूर्ण देश प्रभावित झाला. या कालावधीत कृषी विभाग सदैव तत्पर राहिल्याने राज्यात भाजी पाला व अन्न धान्याचा तुटवडा भासला नाही. त्यामुळे कोरोना काळात कृषी विभागाचे योगदान देखील मोलाचे ठरले, असे राज्याचे कृषी आयुक्त धिरज कुमार म्हणाले.            

मालेगाव :  कोवीड-19 च्या प्रादुर्भावामुळे राज्यासह संपूर्ण देश प्रभावित झाला. या कालावधीत कृषी विभाग सदैव तत्पर राहिल्याने राज्यात भाजी पाला व अन्न धान्याचा तुटवडा भासला नाही. त्यामुळे कोरोना काळात कृषी विभागाचे योगदान देखील मोलाचे ठरले, असे राज्याचे कृषी आयुक्त धिरज कुमार म्हणाले.            

`विकेल ते पिकेल` अंतर्गत समूह आधारित शासकीय, खाजगी संस्थांच्या सहभागातून मका विकास प्रकल्पातंर्गत टेहरे येथील प्रगतशिल शेतकरी धर्मा शेवाळे यांच्या शिवारात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, कृषी क्षेत्रात नाशिक जिल्हा नेहमीच अग्रेसर राहीला आहे. येथील शेतकरी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून विविध प्रयोग राबवतात. ते नेहमीच पथदर्शी ठरतात. त्यामुळे कृषी विभागामार्फत अशा शेतकऱ्यांना तांत्रीक प्रशिक्षण देवून त्यांना अधिक सक्षम व समृध्द करण्यासाठी कृषी विभागत तत्पर राहील.

श्री. धीरज कुमार म्हणाले, शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री अंतर्गत पाच हजार २४३ भाजीपाला उत्पादीत शेतकऱ्यांचे शेतकरी गट तयार केले आहे. तेवीस हजार ५४७ क्विंटल भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. कोरोना कालावधीत दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. विकेल ते पिकेल या बाबीवर कृषी विभाग सध्या काम करित आहे. याच संकल्पनेवर आधारित टेहरे येथील प्रकल्प मका लागवडीपासून विक्रीपर्यंत राबविण्यात आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. या प्रकारचे प्रकल्प राज्यातील सर्व तालुक्यात राबविण्यात येतील.

यावेळी कृषी संचालक डॉ.नारायण शिसोदे, कृषी सहसंचालक संजीव पडवळ, विभागीय अधिक्षक सुनिल वानखेडे, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील, कृषी अधिकारी दिलीप देवरे, कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांसह कृषी अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख