कृषीमंत्री दादा भुसे म्हणाले, अतिवृष्टीग्रस्तांचे तात्काळ पंचनामे करा !

राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यातही शेतकऱ्यांना त्याची झळ बसली. यासंदर्भात अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीकांची पाहणी सुरु केली आहे.
कृषीमंत्री दादा भुसे म्हणाले, अतिवृष्टीग्रस्तांचे तात्काळ पंचनामे करा !

मालेगाव : राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यातही शेतकऱ्यांना त्याची झळ बसली. यासंदर्भात अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीकांची पाहणी सुरु केली आहे. यावेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुढाकार गेऊन विमा कंपन्या आणि शासनाकडे तात्काळ नुकसानीचे पंचनामे करुन त्याचे प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. 

गेल्या आठवड्यात राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. या अतिवृष्टीने अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. मालेगाव तालुक्‍यात गेल्या आठवड्यापासून सततच्या पावसाने कापणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी जमा झाले आहे. पाणी जमा झाल्याने झालेल्या पिकांच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. या शेतकऱ्यांशी चर्चा केली. मालेगाव तालुक्‍यातील पाटणे, आधार खु, चिंचावड परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कांदा, मका, भेंडी, डाळिंब, ऊसाची कृषि मंत्री भुसे यांनी पाहणी केली. संततधार पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त गावांना भेटी देत, तेथील प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी मंत्री भुसे यांनी केली. झालेल्या नुकसानीसह तालुक्‍यात ज्या ठिकाणी संततधार पावसामुळे नुकसान झाले आहे, त्या कृषी क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करुन शासनास प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. 

शेतकऱ्यांनी हे करावे... 
अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत खरीप हंगामात विमा काढला, त्यांनी तात्काळ भारती ऍक्‍सा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या टोल फ्री क्रमांक 1800-103-7712 तसेच ईमेल bharatkolhe7387@gmail.com आणि digvijay.kapse@bhartiaxa.com याव्दारे कंपनीला सुचना द्यावी. यासंदर्भात शासनाने विकसीत केलेल्या मोबाईल क्रॉप इन्शुरंस ऍपवरुन शेतीपिकाचे झालेल्या नुकसानीची माहिती फोटोसह अपलोड करावी. यासंदर्भात कृषी व महसुल प्रशासनास देखील कळविण्यात आले आहे. 

या पहाणी दौऱ्यात यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप देवरे, कृषि अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, शेतकरी तारकचंद तांबे, संतोष शेवाळे, चंद्रकांत अहिरे, तुकाराम बागुल, स्वप्नील पवार, देवाजी पवार, कोमल वाघ, दौलत मोरे, शेखर थोरात, दगडु ठोके, दत्तु थोरात, कारभारी गांगुर्डे, वाल्मीक खैरनार, भाऊसाहेब चव्हाण, मन्साराम जाधव, दिपक बोरसे, बाळु सुर्यवंशी उपस्थित होते. 
... 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com