Agreeculture Minister Dada Bhuse visited farmers house at KONE Village | Sarkarnama

कृषीमंत्री दादा भुसेंना आज विठ्ठल रुक्मिणी म्हणून कोण भेटले?

संपत देवगिरे
बुधवार, 1 जुलै 2020

कृषीमंत्री दादा भुसे यांनी आज कृषी दिनानिमित्त कोणे (त्र्यंबकेश्वर) येथे आज जिल्हास्तरीय कृषी संजीवनी कार्यक्रमाला सुरवात केली. यावेळी त्यांनी बेंडकोळी या शेतक-याच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना साडीचोळी व भटवस्तू दिल्या. 

नाशिक : महाराष्ट्राचे दिवंसग मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज राज्यात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त विविध कार्यक्रम होतात. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी आज हरसूल भागातील कोणे येथील शेतकरी कुटुंबाच्या घरी भेट देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी या शेतकरी दाम्पत्यांना साडीचोळी व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. अचानक झालेल्या या सन्मानाने याकुटुंबाला आनंद गगनात मावेनासा झाला होता. 

कोणे (ता. त्र्यंबकेश्वर) येथे आज कृषी दिनानिमित्त जिल्हास्तरीय कृषी संजीवनी सप्ताहाला आज प्रारंभ झाला. तत्पूर्वी कृषीमंत्री यांनी कार्यक्रमाला न जाता त्यांनी आधी बेंडकोळी या आदिवासी शेतक-याच्या घरी भेट दिली. काळू बेंडकोळी आणि त्यांची पत्नी चंद्रभागा यांची भेट घेऊन त्यांना त्यांनी साडीचोळी व भेटवस्तू दिली. हा शेतकरी अनेक नेते पाहून काहीसा गांगरला होता. जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांसह विविध पदाधिकाऱी भेटल्याने त्यांने आनंद व्यक्त केला.  त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात कृषीमंत्र्यांनी भाताच्या खाचरात यंत्राद्वारे भाताची आवनी केली. तेव्हा उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा दिल्या. 

यावेळी कृषीमंत्री दादा भुसे म्हणाले, शेतकरी चिंतामुक्त झाला पाहिजे, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वप्न आहे. त्या दिशेने जे जे प्रयत्न करता येतील ते सर्व आम्ही करीत आहोत. शेती स्वयंपूर्ण, शेतक-याला सुस्थितीत आणता येईल, अशी व्हावी यासाठी अनेक योजना आम्ही हाती घेतल्या आहेत. आज कृषीदिन असल्याने राज्य शासनाकडून एक नवी योजनाही सुरु होत आहे. या  पार्श्वभूमीवर कृषीमंत्री म्हणून शेतक-याची भेट घ्यावी. त्यांची विचापूस करावी या हेतूने मी हा कार्यक्रम ठरवला होता. आज आषाढी एकादशी आहगे. यानिमित्ताने मला साक्षात विठ्ठल रुक्मिणी भेटल्याचा आनंद झाला. बेंडकोळी या शेतक-याला कृषीमंत्री भेटले याचा आनंद झाला, त्यापेक्षाही त्याने मनमोकळेपणाने चर्चा केली. याचा मला जास्त आनंद आहे.  

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख