कृषिमंत्री दादा भुसेंनी टोचले जिल्हा बॅंक अध्यक्ष केदा आहेरांचे कान!

पतसंस्था व ठेवीदारांसाठी स्वतंत्र नियोजन करावे. मात्र कोणत्याही स्थितीत 30 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज वितरण झालेच पाहिजे, या शब्दांत कृषिमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांना आज खडसावले.
कृषिमंत्री दादा भुसेंनी टोचले जिल्हा बॅंक अध्यक्ष केदा आहेरांचे कान!

मालेगाव : शेतकरी कर्जमुक्ती अंतर्गत जिल्हा बॅंकेला शासनाकडून 915 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यामुळे बॅंकेने कर्जपात्र सभासदांसह, नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही कर्ज वाटपाचे नियोजन करावे. पतसंस्था व ठेवीदारांसाठी स्वतंत्र नियोजन करावे. मात्र कोणत्याही स्थितीत 30 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज वितरण झालेच पाहिजे, या शब्दांत कृषिमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांना आज खडसावले. 

जिल्हा बॅंकेची खरीप कर्जवाटपाची स्थिती समाधानकारक नाही, अशी खंत कृषिमंत्र्यांनी रविवारी व्यक्त केली होती. मालेगाव तालुक्‍यात 122 कोटींचा कर्जपुरवठा अपेक्षित आहे. मात्र केवळ 29 कोटी रुपये कर्जवाटप झाले. त्यामुळे कृषिमंत्र्यांनी प्रसंगी जिल्हा बॅंकेत ठिय्या देण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. या पार्श्‍वभूमीवर आज जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर, ज्येष्ठ संचालक शिरीष कोतवाल यांसह प्रमुख अधिकाऱ्यांनी श्री. भुसे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा बॅंकेवर ठेविदारांचा मोठा दबाव आहे. या ठेविदारांना पैसे देने आवश्‍यक आहे. जिल्हा बॅंकेला जिल्हा पतपुरवठा आराखडा व अग्रणी बॅंकेच्या बैठकीत दिलेला लक्ष्यांक पूर्ण केल्याची माहिती दिली. मात्र त्यावर बुस ेयांचे समाधान झाले नाही. त्यांनी बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले. माझी भूमिका ठाम आहे. त्यात काहीही बदल होणार नाही. तातडीने कर्जपुरवठा सुरु करावा, असे सुनावले. त्यानंतर झालेल्या बैठकीत श्री. भुसे यांनी शेतकऱ्यांना कर्जवितरणा संदर्भात विविध सूचना केल्या. त्यानंतर बॅंकेच्या अध्यक्षांनी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत कर्ज वितरण करु. मालेगाव तालुक्‍यासाठी पाच कोटी रुपये तातडीने मंजुर करण्यात येतील, असे यावेळी बॅंकेचे अध्यक्ष श्री. आहेर यांनी सांगितले. 

जिल्हा बॅंकेने पतसंस्था व व्यक्तिगत ठेवीदारांच्या ठेवीसंदर्भात, बॅंकेची आर्थिक स्थिती, बॅंकेची सामोपचार कर्ज परतफेड योजना, जिल्ह्यातील कर्जमाफी, कर्जमाफीस पात्र सभासद यांसह विविध विषयांवर चर्चा झाली. मालेगाव तालुक्‍यातील बारा हजार 900 सभासदांना 122 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. हे सर्व शेतकरी कर्जास पात्र आहेत. त्यांच्यासाठी मालेगाव विभागाने बॅंकेकडे 90 कोटीची मागणी केली आहे. जिल्हा बॅंकेने आजवर चार हजार 720 सभासदांना 29 कोटी रुपयांचे वाटप केले आहे. सुमारे सात हजार शेतकरी अद्यापही कर्जापासून वंचित आहेत. त्यांच्यासाठी 61 कोटी रुपये बॅंकेकडून मिळावेत, असे सप्ष्ट करण्यात आले. यासंदर्भात पाच कोटी रुपये मालेगाव तालुक्‍यातील प्रलंबित कर्ज प्रकरणांसाठी तातडीने देण्यात येतील, या आश्‍वासनानंतर कृषिमंत्री श्री. भुसे यांनी जिल्हा बॅंकेत ठिय्या देण्याचा निर्णय मागे घेतला. 

राज्य बॅंकेकडे बैठक घेणार 
जिल्हा बॅंकेचे संचालक श्री. कोतवाल यांनी यावेळी जिल्हा बॅंकेला पीककर्जाबरोबरच मध्यम मुदतीचा कर्जपुरवठा करणे आवश्‍यक आहे. जिल्हा बॅंकेची स्थिती पहाता राज्य सहकारी बॅंकेकडून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी विनंती श्री. भुसे यांना केली. बॅंकेचे शिष्टमंडळ मुंबई येथे श्री. भुसे व राज्य सहकारी बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेईल, असे निश्‍चित करण्यात आले. लवकरच त्याबाबत संबंधीत यंत्रणांशी चर्चा केली जाणार आहे. 

यावेळी बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, संचालक गोरख पवार, गटसचिव संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विश्‍वनाथ निकम, पंचायत समितीचे माजी सभापती धर्मा पवार, सुरेश पवार, शिवसेनेचे नेते संजय दुसाने, जिल्हा बॅंकेचे विभागीय अधिकारी एम. टी. डंबाळे, शाखा निरीक्षक गोरख जाधव उपस्थित होते. 
... 
 
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=ieHfRb3BmwcAX92Z_rl&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=b81215d1826d3cdd00a98ff0d9504f7c&oe=5F840927

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com