नाथाभाऊंच्या पक्षत्यागानंतर गिरीशभाऊंचा जळगावात शेतकरी मोर्चा  - After Nathabhau's resignation, Girishbhau's farmers' morcha in Jalgaon | Politics Marathi News - Sarkarnama

नाथाभाऊंच्या पक्षत्यागानंतर गिरीशभाऊंचा जळगावात शेतकरी मोर्चा 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.

जळगाव, : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजप पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांना आज जिल्ह्यात आपले स्वतंत्र नेतृत्व दाखवित शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान मोर्चा काढला. 

केळी पिक विमा योजनेचे निकष त्वरीत बदलावेत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरीत द्यावी, कापूस खरेदी केंद्रे त्वरी सुरू करावी या मागण्यासाठी जिल्हा भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयवर किसान मोर्चा काढण्यात आला. खासदार रक्षा खडसे, भाजप जिल्हाध्यक्ष,आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे आदी उपस्थित होते. 

यावेळी शेतकऱ्यांच्य विविध मागण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल..शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे,केळ पिक विम्याचे निकष त्वरीत बदला, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळालाच पाहिजे, जो सरकार निक्कमी है,वो सरकार बदलनी है!अशा राज्य सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. 

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. यावेळी महाजन म्हणाले, की राज्य सरकारने पिक विम्याचे निकष बदलून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना अद्याही भरपाई मिळालेली नाही. राज्यातील हे सरकार शेतकऱ्यावर अन्याय करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

खासदार रक्षा खडसे म्हणाल्या, की राज्यातील मंत्र्यानी केंद्रांतील शासनाने जो आदेश काढला आहे. त्याबाबत अभ्यास करण्याची गरज आहे. केंद्राने केळी पिक विम्याबाबत काय अध्यादेश काढला आहे. त्याचा अभ्यास करावा.असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी क्रॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचे जिल्हा पातळीवरील हे पहिलेच आंदोलन होते. गिरीश महाजन यांनी प्रथमच स्वतंत्र नेतृत्व केले. आंदोलनात जिल्हाभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खडसे यांनी पक्ष सोडला तरी पक्षाची ताकद कायम असल्याचे भाजपने आज आंदोलनाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे दिले आहे. विशेष म्हणजे भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनीही या मोर्चाचे नेतृत्व करून पक्षासोबत आपण खंबीर असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख