सचिन वाझे प्रकरण हाताळणार नाशिकचे अजय मिसर

सरकारसाठी डोकेदुखी ठरलेल्या संभाषण लिक प्रकरणाच्या मुंबई हाय कोर्टासह मुंबई सेशन कोर्टात दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी राज्य सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून नाशकिचे अॅड. अजय मिसर यांची नियुक्ती केली आहे.
Ajay Misar
Ajay Misar

नाशिक : सरकारसाठी डोकेदुखी ठरलेल्या संभाषण लिक प्रकरणाच्या मुंबई हाय कोर्टासह मुंबई सेशन कोर्टात दाखल (Sachin Waze and Parambir singh audio clipp case) असलेल्या गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी राज्य सरकारने (State Government)  विशेष सरकारी वकील म्हणून नाशकिचे अॅड. अजय मिसर (Specail Government pleader Adv Ajay Misar) यांची नियुक्ती केली आहे.

मुंबई पोलिस दलातील बडतर्फ सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग, गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिस दलातील माजी पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यातील संभाषण लिक प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने नाशिकचे विशेष सरकारी वकील अॅड. मिसर यांची सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती केली आहे.

अनेक संवेदनशील प्रकरणे हाताळणाऱ्या अॅड. मिसर यांच्या नियुक्तीबाबत बोलताना त्यांनी सांगितले, की या प्रकरणामध्ये मुंबई हाय कोर्ट, तसेच मुंबईतील सेशन कोर्टांमध्ये दावे दाखल आहेत. या दाव्यांची टप्प्याटप्प्याने माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल. तुर्तास फक्त नियुक्ती झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हत्या, खंडणी उकळणे, हप्तेखोरी अशा विविध आरोपांमुळे मुंबई पोलिस दलासह राज्य सरकारची बदनामी झाली असून, यातील नेमकी कोणते तथ्य कोर्टाच्या कार्यवाहीत समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com