अशी परतवणार नाशिकमध्ये कोरोनाची तिसरी लाट !

कोरोनाची दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन व रेमडेसिव्हिरचा पुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. अशा स्थितीत तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

नाशिक : कोरोनाची दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन व रेमडेसिव्हिरचा (Oxygen & Remdecivier Supply) पुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. अशा स्थितीत तिसऱ्या लाटेत लहान मुलांना (Third wave of Covid 19 harmfull to Children) अधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  त्या अनुषंगाने लहान मुलांच्या उपाचारासाठी स्वंतत्र कक्ष तयार करावा.  त्याबाबत नियोजन करावे, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhubal) यांनी केले आहे.

कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ उपस्थित होते.  

ते म्हणाले, कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियोजन करण्यात येत आहे. आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करून त्या कायमस्वरूपी उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी मनुष्यबळ वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. 

श्री. भुजबळ म्हणाले, जिल्ह्यातील ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी जिल्ह्यात 29 ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती केंद्र सुरू करण्यात येत आहेत. ज्यामुळे भविष्यातील ऑक्सिजनची गरज पूर्ण करणे शक्य होणार आहे. आदिवासी भागातील नागरिक ज्या डॉक्टर व तेथील स्थानिक औषोधोपचार करणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवून आजारपणात इलाज करतात, अशा डॉक्टर्स व स्थानिक लोकांची बैठक घेऊन त्यांना कोरोनाच्या लढाईत त्यांना सहभागी करून घेण्यात यावे. आदिवासी भागातील कोरोना उपचारांविषयी जागृती होऊन आदिवासी भागातील रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल.

लसीकरणाबाबत त्यांनी विविध सूचना केल्या. ते म्हणाले, १८  ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी ऑनलाईन नावनोंदणी करतांना काही तांत्रिक अडचणी येत असल्याने नोंदणीसाठी नवीन प्रणाली विकसित करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या स्थिर होती, ती नव्याने वाढू नये यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी. पोलिसांच्या सहकार्याशिवाय निर्बंध यशस्वी होणार नाही. 
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, महापौर सतीश कुलकर्णी, मालेगावच्या महापौर ताहेरा शेख रशिद, आमदार सर्वश्री नरेंद्र दराडे, ॲड  माणिकराव कोकाटे, दिलीप बोरसे, दिलीप बनकर, मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक, डॉ. राहुल आहेर, सीमा हिरे, नितीन पवार, हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, निवासी उपजिलहाधिकारी भागवत डोईफोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार आदी उपस्थित होते.
-----
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com