खाजगी कोरोना लॅबने केले `असे` काम, की प्रशासनाने घातली बंदी? - Administration issued notice to private Covid-19 lab | Politics Marathi News - Sarkarnama

खाजगी कोरोना लॅबने केले `असे` काम, की प्रशासनाने घातली बंदी?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी शासन, स्वयंसेवी संस्था व रुग्ण जंग जंग पछाडताहेत. मात्र खाजगी कोरोना टेस्टींग लॅंब त्याकडे व्यवसायाची संधी म्हणून पाहताहेत, की काय? अशी शंका निर्माण झाली आहे.

 नाशिक : कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी शासन, स्वयंसेवी संस्था व रुग्ण जंग जंग पछाडताहेत. मात्र खाजगी कोरोना टेस्टींग लॅंब त्याकडे व्यवसायाची संधी म्हणून पाहताहेत, की काय? अशी शंका निर्माण झाली आहे. त्यांची ही संशयास्पद कार्यपद्धती लक्षात आल्यावर नोटीस बजावली. तरीही सुधारणा न झाल्याने शहरातील पाच खाजगी लॅबवर काम थांबविण्याची कारवाई प्रशासनाने केली आहे.

याबाबतची माहिती अशी, की कोरोना प्रादुर्भावाची साखळी खंडीत करण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कोरोना बाधित नागरिकांचा पत्ता रिपोर्टवर तसेच पालिकेने विकसित केलेल्या आयसीएमआर पोर्टलवर अपलोड करणे बंधकारक केले आहे. शहरातील मान्यता देण्यात आलेल्या पाच खासगी लॅबकडून त्या नियमांची पुर्तता केली जात नाही. त्यामुळे पुढील सुचना येईपर्यंत त्यांच्यावर तपासणीसाठी बंदी घालण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.  

शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता दररोज पाचशे ते सहाशेच्या आसपास आढळून येत आहे. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच्यावर तत्काळ महापालिका किंवा खासगी रुग्णालयांमध्ये उपचार होतात. त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तपासणी केली जाते. त्याची हाय व लो रिस्क अशी वर्गवारी करून उपचार केले जातात. त्याद्वारे कोरोनाची साखळी खंडीत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. परंतू शहरात कोरोना विषाणु तपासणीची मान्यता देण्यात आलेल्या खासगी लॅबकडून पालिकेच्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण करण्याचे काम होत आहे. तसे प्रकार समोर आले आहे.

खासगी लॅबमध्ये स्वॅब तपासणी साठी गेल्यानंतर त्याचा पॉझिटिव्ह किंवा निगेटीव्ह रिपोर्ट तयार केला जातो. पॉझिटिव्ह रुग्णांच्या रिपोर्टमध्ये रुग्णाचे नाव, पत्ता तसेच रिपोर्ट पालिकेच्या आयसीएमआर पोर्टलवर अपलोड करावा लागतो. परंतू खासगी लॅबकडून फक्त नाशिक असा उल्लेख केला जातो. संबंधित रुग्णाचा पत्ता शोधण्यापासून ते कॉन्टॅक्ट ट्रेसिंग शोधण्यापर्यंत अनेक अडचणी येतात. त्यामुळे कोरोना प्रादुर्भावाची साखळी खंडीत करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसतं आहे. पालिकेच्या वैद्यकीय विभागाने अनेकदा नोटीस, सुचना देऊनही दखल न घेतल्याने अखेरीस पुढील सुचना येईपर्यंत या लॅबवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. आदेशानंतरही लॅबने चाचण्या घेतल्यास महाराष्ट्र साथरोग प्रतिबंध कायदा १९८७, कोव्हीड उपायोजना २०२० व भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्याचा ईशारा देण्यात आला आहे. 
... 
खासगी लॅबवर संशय? 
खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिले आकारून आर्थिक लुट होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर रुग्णालयांमध्ये लेखा परिक्षक केले. हा निर्णय घेतल्यावर आता लॅबकडून नियमबाह्य लुट सुरु असल्याचा संशय आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या रिपोर्टमध्ये नाव, पत्ता दिल्यास रुग्णाला शोधून उपचार सुरु केले जाता. त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जातो. कोरोनाची साखळी खंडीत करणे शक्य होते. मात्र खाजगी लॅबकडून फक्त नाशिक असा उल्लेख केला जातो.  हा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लपविण्याचा प्रकार असल्याचा संशय महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. ....
 

 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख