कार्यकर्त्यांनी मंदिर उघडले; चंद्रकांत पाटलांनी हजेरी लावली 

संपूर्ण जगातून कोरोना महामारीचे संकट संपवावे, या हेतूने शिरसाळा मारुती मंदिरात महारुद्र याग, महाअभिषेक, पूजा करण्यात आली.
Activists opened the temple; Chandrakant Patil attended
Activists opened the temple; Chandrakant Patil attended

बोदवड (जि. जळगाव) : राज्यात सध्या मंदिरे उघडण्यास बंदी असताना बोदवड (जि. जळगाव) तालुक्‍यातील शिरसाळा येथील मारुती मंदिर उघडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गाभाऱ्यात जाऊन मारुतीची पूजाअर्चा आणि आरती केली. विशेष म्हणजे या कार्यक्रमास सत्ताधारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह मुक्ताईनगर आणि बोदवड येथील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

दरम्यान, एकीकडे मुख्यमंत्री कोरोनाबाबत प्रचंड काळजी घेत असताना त्यांच्या पक्षाच्या आमदाराने सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याने तालुक्‍यात चर्चा होती. 

संपूर्ण जगात कोरोना संसर्गजन्य महामारीने थैमान घातले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. जनतेसाठी सदैव धडपडणाऱ्या या लोक नेत्याची कोरोना आजारातून लवकर मुक्तता व्हावी. ते सदृढ होत पुन्हा जनसेवेत रुजू व्हावेत.

तसेच, संपूर्ण जगातून कोरोना महामारीचे संकट संपवावे, या हेतूने शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख तथा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताई नगर तालुका शिवसेनेतर्फे जागृत देवस्थान शिरसाळा मारुती मंदिरात महारुद्र याग महाअभिषेक पूजा करण्यात आली. 

या पुजेसाठी आमदार पाटील, तालुका प्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे, शहर संघटक वसंत भलभले, बोदवड शहरप्रमुख अमित बडगुजर, माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे, नगरसेवक संतोष मराठे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख पवन सोनवणे, युवासेना तालुका प्रमुख पंकज राणे, शिवसेना विभागप्रमुख महेंद्र मोंढाळे, राजेंद्र तळेले, सचिन(पिंटू)पाटील, विशाल भोजने, रवींद्र दांडगे, गणेश वंजारी, अमोल व्यवहारे, योगेश पाटील, भागवत पाटील, पप्पू मराठे, सुनील गवते, विशाल पाटील, स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. 

कोरोनामुळे राज्यातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद आहेत. मुक्ताईनगर, बोदवड तालुक्‍यातील मंदिरेही बंद आहेत. शिरसाळा येथील हनुमान मंदिरही दर्शनासाठी बंद आहे. सर्वसामान्य भाविक बाहेरूनच दर्शन घेतात. मात्र, आज शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार पाटील यांनी त्या ठिकाणी जाऊन पूजा केली आणि लॉकडाउनचा फज्जा उडविला. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच सरकारच्या आदेशाची पायमल्ली केल्याची चर्चा आहे. 

सर्व नियमांचे पालन करत मंदिराच्या बाहेरील आवारात हवनाचा कार्यक्रम शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्या कार्यक्रमास उपस्थित होतो. मंदिर उघडून प्रवेश केला नाही. राजकीय सुडबुद्धीने जुने व्हिडीओ फिरवले जात आहेत. 
- चंद्रकांत पाटील  आमदार, मुक्ताईनगर 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com