Bramhgiri
Bramhgiri

ब्रह्मगिरी पर्वतावर अवैध उत्खननाबाबत कारवाईचा बडगा

ब्रह्मगिरी, सह्याद्री पर्वत रांगेत होत असलेल्या अवैध उत्खननाबाबत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. त्यामुळे विविध पर्यावरणवादी कार्यकर्ते व ब्रम्हगिरी कृती समितीने समाधान व्यक्त केले.

नाशिक : ब्रह्मगिरी, सह्याद्री पर्वत रांगेत होत असलेल्या अवैध उत्खननाबाबत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश (Action against Bramhgiri Mountain Excavation) आज पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. त्यामुळे विविध पर्यावरणवादी कार्यकर्ते व ब्रम्हगिरी कृती समितीने (Bramhgiri Action  committee Express comfort on Decision) समाधान व्यक्त केले. 

यावेळी श्री. भुजबळ यांनी लवकरच दोषी अधिकारी व उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन ब्रम्हगिरी कृती समितीच्या सदस्यांना दिले.

ब्रह्मगिरी आणि सह्याद्री पर्वत रांगेत होत असलेल्या उत्खननाबाबत आज ब्रम्हगिरी कृती समितीच्या सदस्यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या सह्याद्री पर्वत रांगेतील पहिला किल्ला ब्रह्मगिरी मेटघर आहे. येथे सुपलीचा मेट या आदिवासी बांधवांच्या पाड्याखाली जिलेटिन कांड्यांचा वापर करून सुरुंग लावून ब्रह्मगिरीच्या पोटात 'ब्रम्हा ग्रीन' या प्रकल्पांतर्गत खाजगी विकासकाने पेसा व वनहक्क कायद्यांचा भंग करून अवैध उत्खनन केले आहे.

स्थान लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतरांगेत अवैध उत्खननामुळे माळीण सारखी दुर्घटना होण्याचा संभव असताना वन, महसूल विभाग, खनिकर्म अधिकारी, जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. ब्रह्मगिरी येथे उत्खननाचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र असणाऱ्या नाशिक जवळच्या संतोषा, भागडी पर्वतरांगेत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध उत्खननाने संपूर्ण डोंगरच नेस्तनाबूत केलेला आहे.  संपूर्ण जिल्ह्यात अवैध उत्खननाने सह्याद्रीचे लचके तोडले जात आहेत. यामुळे वन्यजीव, पर्यावरण, जैवविविधतेचे कधीही भरून न येणारे नुकसान होऊन संपूर्ण जीवसृष्टीस धोका निर्माण झाला आहे.

युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारसा यादीत असणाऱ्या सह्याद्री पर्वतरांगेचे संवर्धन,संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सह्याद्री पर्वतरांगेत आता सुरुंग/ जिलेटीन कांड्यांचा वापर, खोदकाम, खाणकाम बांधकास पूर्णतः बंदी आणावी. आदिवासी बांधवांच्या न्याय्य हक्काचे रक्षण करून योग्य तो कायदा करून सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगर उतारावरील जमिनीचा राज्याचे हरित अच्छादन ३३ टक्के वाढवावे. त्यासाठी कायद्याचा उपयोग करावा. ब्रह्मगिरी उत्खननातील सर्व दोषींची चौकशी करून कारवाई करावी.  ब्रह्मगिरी, सह्याद्री उत्खननात वापरल्या गेलेल्या जिलेटिन कांड्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली.

या प्रसंगी पालकमंत्री भुजबळ यांनी या घटनेची दखल घेऊन ब्रह्मगिरी, सह्याद्री पर्वत रांगेत होत असलेल्या अवैध उत्खननाबाबत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. लवकरच या घटनेची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे ब्रम्हगिरी बचाव समितीच्या सदस्यांना त्यांनी सांगितले. 

यावेळी ब्रम्हगिरी बचाव समितीचे निशिकांत पगारे, महंत गणेशानंद सरस्वती, दत्तात्रय ढगे, जगबिरसिंह, प्रकाश निकुंभ, कुलदीप कौर यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com