अंघोळीला गेलेले `अभाविप`चे राष्ट्रीय मंत्री ओव्हाळ यांचा नदीत बुडून मृत्यू ! - ABVP Leader Avinash Ovhal dead in river water | Politics Marathi News - Sarkarnama

अंघोळीला गेलेले `अभाविप`चे राष्ट्रीय मंत्री ओव्हाळ यांचा नदीत बुडून मृत्यू !

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ संघटनात्मक कामासाठी दौऱ्यावर  होते. आज ते धडगाव येथे संघटनात्मक कामासाठी  आले होते. दुपारी ते बिलगाव येथे नदीत आंघोळ करत असताना त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

नंदुरबार : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ संघटनात्मक कामासाठी दौऱ्यावर  होते. आज ते धडगाव येथे संघटनात्मक कामासाठी  आले होते. दुपारी ते बिलगाव येथे नदीत आंघोळ करत असताना त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

याबाबत धडगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मुंबई येथील राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ हे मंगळवारपासून नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.  ते कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधन्यासाठी धडगाव तालुक्यात गेले होते. तेथील काही कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन रात्री त्या परिसरातच त्यांनी मुक्काम केला. आज  सकाळी दैनंदिन नियोजन करून बिलगाव दुपारी बाराच्या सुमारास ते येथील नदीत आंघोळीसाठी गेले. यावेळी  त्याठिकाणी पाय घसरून ते पाण्यात पडले. त्यामुळे नदीच्या खोल पाण्यात बुडून त्यांच्या मृत्यू झाला. 

वाचविण्याचे प्रयत्न अयशस्वी
श्री. ओव्हळ पाण्यात बुडाल्याचे लक्षात आल्यावर एकच धावाधाव झाली. यावेळेस सोबत असलेल्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पाण्यात उड्या घेऊन त्यांना बाहेर काढला. मात्र  तोपर्यंत ओव्हाळ यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती धडगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ओव्हाळ यांचा मृतदेह धडगाव ग्रामीण रुग्णालयात आणला. या घटनेची माहिती मिळताच नंदुरबार जिल्ह्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तेथे गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत पोलिस व रुग्णालयाची कार्यवाही पूर्ण केल्यावर त्यांचा मृतदेह मुंबईकडे रवाना करण्यात आला.
....
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख