`आप` म्हणते, राजकारण बंद करुन विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरु करा !

विद्यार्थी हा देखील समाजाचा व प्रत्येक कुटुंबाचा महत्वाचा घठक आहे. आज हे विद्यार्थी परिक्षांचे निकाल आणि शैक्षणिक प्रवेश यासंदर्भात अस्वस्थ आहेत. त्यांना दिलासा हवा आहे. राजकारण नको.
`आप` म्हणते, राजकारण बंद करुन विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरु करा !


नाशिक : विद्यार्थी हा देखील समाजाचा व प्रत्येक कुटुंबाचा महत्वाचा घठक आहे. आज हे विद्यार्थी परिक्षांचे निकाल आणि शैक्षणिक प्रवेश यासंदर्भात अस्वस्थ आहेत. त्यांना दिलासा हवा आहे. राजकारण नको. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी राजकारण बंद करुन, निकाल जाहिर करावेत, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीचे प्रवक्ते अभिजीत गोसावी यांनी केली आहे. 

परिक्षा घ्याव्यात, की घेऊ नये हा विषय थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. न्यायालयाची सुनवाणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही सुनावणी 14 ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलली आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांना देखील `तारीख पे तारीख`ची सवय लावली जातेय का? असा प्रश्न `आप`च्या युवा आघाडीने केला आहे. 

ते म्हणाले, भारतात गेल्या चोविस तासांत जगातील सर्वाधिक बासष्ट हजार 64 कोरोना रुग्ण सापडले आहेत. बावीस लाखांहून अधिक रुग्णसंख्या झाली आहे.  हा वाढता वेग पाहता, भारत लवकरच जगात सर्वाधिक कोरोना रुग्णांचा देश बनण्याची शक्यता आहे. भारतातील आरोग्य व्यवस्था पाहता परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते. त्यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. मात्र परीक्षेचा प्रश्न राजकीय प्रतिष्ठेचा प्रश्न केल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य लटकले आहे.  जवळपास नव्वद टक्के विद्यार्थ्यांचे मूल्यांकन झालेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करून पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू व्हायला हवी होती. ती झाली. राजकारण बाजुला ठेऊ निकाल व प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा. 

श्री. गोसावी म्हणाले, डोळ्यावर भात बांधल्यामुळे कोरोनाची वरील परिस्थिती आजवर विद्यापीठ अनुदान आयोग आणि केंद्र सरकारला दिसत नाही. त्यांनी वस्तुस्थिती लक्षात घ्यावी, ही विद्यार्थ्यांची खरी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा निर्णय घेतल्याबद्दल केंद्र सरकारचे व विद्यापीठ अनुदान आयोगाचे अभिनंदन, करावे की काय?. कारण पुन्हा एकदा सुनावणी लांबणीवर पडली आहे. 
...
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=oEJfDyarqkIAX-7626e&_nc_ht=scontent-sin6-2.xx&oh=e46cf2df41c8ed247930ff984f9e63d4&oe=5F5887A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com