एकाच दिवसात 905 बाधीत, `या`मुळे हातपाय पसरतोय कोरोना..

प्रशासनाने तळागाळात जाऊन रुग्णांचा शोध सुरु केला आहे. त्यामुळे आज एकाच दिवशी शहरातील 574 रुग्णांसह जिल्हाभरात 905 रुग्ण आढळले. प्रशासनाने प्रबोधनाची मोहीम सुरु केली आहे.
एकाच दिवसात 905 बाधीत, `या`मुळे हातपाय पसरतोय कोरोना..

नाशिक : प्रशासनाने तळागाळात जाऊन रुग्णांचा शोध सुरु केला आहे. त्यामुळे आज एकाच दिवशी शहरातील 574 रुग्णांसह जिल्हाभरात 905 रुग्ण आढळले. प्रशासनाने प्रबोधनाची मोहीम सुरु केली आहे. मात्र तरीही मास्कचा वापर टाळणे, चुकीच्या पद्धतीने मास्कचा वापर आणि गर्दीत मिसळण्याची हौस यामुळे कोरोना हातपाय पसरु लागला आहे. या सवयी टाळल्या नाहीत, तर अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. 

नाशिक शहर व जिल्ह्यात दाखल होणारे रुग्ण आणि उपचार घेणारे यांच्यात अद्यापही पाठ शिवणीचा खेळ सुरु आहे. त्यामुळे कधी दाखल होणारे रुग्ण अधिक तर कधी बरे होणारे  अधिक. हा ट्रेंड निश्चित होईपर्यंत कोरोना नियंत्रणात येण्याचा विश्वास निर्माण होणार नाही. आज जिल्हा शासकीय रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिका-यांनी दिलेल्या अहवालानुसार जिल्हा रुग्णालयात 5, महापालिकेच्या रुग्णालयांत 734, डॅा वसंत पवार रुग्णालयात 21 व अन्यत्र 145 असे 905 नवे रुग्ण दाखल झाले. सध्या सहा हजार 698 रुग्ण उपचार घेत आहेत. एकुण तपासण्यांत 26.19 टक्के रुग्ण पॅाझिटिव्ह आढळतात. 

रुग्णसंख्या नियंत्रणात न येण्याचे प्रमुख कारण नागरिकांचा निष्काळजीपणा असल्याचे चित्र आहे. बहुतांश नागरिक मास्कचा वापर करीत नाहीत. जे नागरिक वापर करतात, ते सदोष वापरतात. अनेकदा नाक उघडे ठेऊन मास्क गळ्यात किंवा चेह-याच्या खाली लटकत असतो. सध्या अनलॅाकडाऊऩची प्रक्रीया सुरु झाली आहे. दुकाने, बाजारपेठा खुल्या आहेत. त्यामुळे महिला, नागरिक बिनधास्तपणे गर्दीत मिसळतात. त्यासाठी कोणतिही दक्षता घेत नाही. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. याबाबत प्रशासनाकडून सातत्याने प्रबोधन केले जात आहे. मात्र त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नाही, ही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची समस्या आहे.   

महापालिकेने शहरात मिशन झिरो नाशिक ही मोहिम सुरु केली आहे. त्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी कॅाग्रेस, कॅाग्रेस, मार्क्सवादी कम्युनीस्ट पक्ष यांसह विविध सामाजिक संस्था आणि नगरसेवक सक्रीय आहेत. घरोघरी जाऊन नागरीकांची तपासणी केली जात आहे. महानगरपालिका हद्दीत शनिवारपर्यंत कोरोनाचे नऊ हजार 796 रुग्ण आढळले आहेत. आज शहरात दोन हजार 367 जणांची तपासणी झाली. यामध्ये ३९७ कोरोना बाधीत रुग्ण आढळले. गेल्या चोविस तासात शहरात 574 नव्या रुग्णांची भर पडली आहे. आत्तापर्यंत शहरात एक हजार 443 प्रतिबंधित क्षेत्र निश्चित केले असून शहरात कोरोनाच्या संसर्गाने २८२ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या उपचार घेत असलेले दोन हजार ७७ रुग्ण असून ७४४९  रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले आहे. 

आमदार देवयानी फरांदे निगेटिव्ह 

आज इंदिरानगर येथे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष, नगरसेवक अजिंक्य साने यांनी कोरोना रॅपीड अॅटीजेन टेस्ट शिबिरात वैद्यकीय पथकाकडुन तपासण्या करण्यात आल्या. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे यांची टेस्ट करण्यात आली. त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली. जास्तीत जास्त नागरिकांनी तपासणी करून सहकार्य करावे असे आवाहन आमदार फरांदे यांनी केले. सभागृह नेते सतिश सोनवणे, नगरसेवक चंद्रकांत खोडे, सुनील देसाई, सचिन कुलकर्णी, सरचिटणीस उदय जोशी, रुपाली नेर, राजश्री भावसार, शैला विसपुते, धीरज वझरे, संजय शिंदे आदी उपस्थित होते.यावेळी बाधितांना समुपदेशन करून त्यांना तात्काळ महापालिकेच्या डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयात पाठविण्यात आले.
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=0lJVgWgftFsAX8xbyUW&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=0605f1ea381be9b62731a70697b5db36&oe=5F4CAA27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com