नाशिकला तीन दिवसांत ८०७ कोराना मृत्यूच्या नोंदी - 807 corona death registered on corona portal in Three days, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

नाशिकला तीन दिवसांत ८०७ कोराना मृत्यूच्या नोंदी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 13 जून 2021

गेल्‍या काही महिन्‍यांमध्ये झालेल्‍या मृतांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. शनिवारी (ता. १२) जिल्ह्या‍यातील ३३३ मृतांची नोंद झाली असून, गेल्‍या तीन दिवसांत एकूण ८०७ मृतांच्‍या नोंदी पोर्टलवर झाल्‍या आहेत. तर दिवसभरात १९ बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे.

नाशिक : गेल्‍या काही महिन्‍यांमध्ये झालेल्‍या मृतांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. (Corona death data uploading is still on in Nashik) शनिवारी जिल्ह्या‍यातील ३३३ मृतांची नोंद झाली (On Saturday 333 deaths registered in single day) असून, गेल्‍या तीन दिवसांत एकूण ८०७ मृतांच्‍या नोंदी पोर्टलवर झाल्‍या आहेत. (807 deaths information upload on three days) तर दिवसभरात १९ बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे.

रुग्‍णालयातील त्‍यांच्‍याकडील मृतांची माहिती तातडीने अपलोड करण्याच्‍या सूचना यापूर्वीच प्रशासनाने दिल्‍या आहेत. त्‍यानुसार गेल्‍या तीन दिवसांपासून ही प्रक्रिया युद्धपातळीवर राबविली जाते आहे. गुरुवारी (ता. १०) दिवसभरात २६०, शुक्रवारी (ता. ११) जिल्ह्यात २१४, तर शनिवारी (ता. १२) जिल्ह्यात ३३३ मृतांची माहिती अपलोड झाली.

नाशिक ग्रामीणमधील २११, नाशिक शहरातील ११२, मालेगाव महापालिका क्षेत्रातील दहा मृतांचा समावेश आहे. दरम्‍यान, शनिवारी झालेल्‍या मृत्‍यूंमध्ये नाशिक ग्रामीणमधील वीस, नाशिक शहरातील पाच, मालेगाव महापालिका क्षेत्रातील दोघा मृतांचा समावेश आहे.

शनिवारी नाशिक ग्रामीण क्षेत्रात ३०२ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. नाशिक शहरातील ८२, मालेगाव महापालिका क्षेत्रातील दहा, तर जिल्‍हाबाहेरील एका रुग्‍णाचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला. जिल्ह्यात ३२९ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. सायंकाळी उशिरापर्यंत ९१५ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. यात नाशिक ग्रामीणमधील २९५, नाशिक शहरातील २५०, मालेगावच्‍या ३७० रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालयांत व कोविड केअर सेंटर, गृहविलगीकरणात ७७१ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी ७०७ रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. जिल्‍हा रुग्‍णालय व डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्‍येकी दोन रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये ३९, तर मालेगाव महापालिका क्षेत्रात २१ रुग्‍ण दाखल झाले.
...

हेही वाचा...

युतीच्या सरकारमध्ये शिवसेना गुलाम होती...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख