नाशिकच्या कारागृहात कोरोनाचा शिरकाव, आठ कैदी पॅाझिटिव्ह - 8 prisoners found covid19 positive in nashik road prison | Politics Marathi News - Sarkarnama

नाशिकच्या कारागृहात कोरोनाचा शिरकाव, आठ कैदी पॅाझिटिव्ह

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जुलै 2020

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाच्या तात्पुरत्या कारगृहात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथील आठ तत्पुरत्या कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने दोनशे कैद्यांची तपासणी सुरु केली आहे.

नाशिक : नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाच्या तात्पुरत्या कारगृहात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथील आठ तत्पुरत्या कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने दोनशे कैद्यांची तपासणी सुरु केली आहे. 

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह येथील तात्पुरत्या कारागृहामध्ये सध्या 320 संशयीत आरोपी न्यायाधीन कैद्यांपैकी आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या वार्डातील 200 कैद्यांची कोरोना चाचणी घेण्याचे काम सुरू आहे, अचानक वाढलेल्या कोरोना बधित कैद्यांमुळे कारागृह प्रशासनाने महापालिकेच्या जेल रोड पाण्याच्या टाकी जवळच्या शाळेत कोरोना बाधित कैद्यासाठी कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

आज सकाळी उर्वरीत दोनशे कायद्याची रॅपिड टेस्ट सुरू झाली आहे. सामान्य रुग्णालयातील   वैद्यकीय पथकाने बुधवारी या के. एन. केला विद्यालयातील कैद्याच्या तात्पुरत्या जेलला भेट देऊन तेथील शंभर आरोपींच्या कोरोना चाचण्या घेतल्या होत्या. त्यात आठ जणांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे याठिकाणी नेमणुकीस असलेले अधिकारी व कर्मचारी तसेच आरोपींमध्ये भितीचे वातावरण आहे. राज्यात सगळ्या कारागृहांमध्ये कैदी कोरोना बाधित आढळले आहेत. फक्त नाशिक रोड कारागृहात एकही रुग्ण नव्हता. मात्र आता या कारागृहात देखील  कोरोनाचा शिरकाव झाला आहे

राज्यातील बहुतांश कारागृहांत क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यावर गृह मंत्रालयाने त्याबाबत विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी वैद्यकीय पथकाकडून नियमीतपणे त्यावर देखरेख ठेवली जात होती. बाहेरच्या व्यक्तीला कारागृहातील भेटी बंद करण्यात आल्या आहेत. कारागृह रक्षक (पोलिस) यांची ड्युटी सलग आठ दिवसांची करण्यात आली आहे. तत्पुरते व न्यायाधीन कैद्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. महत्वाच्या खटल्यातील कैद्यांसाठी कारागृहातच सुनावणीची प्रक्रीया देखील सुरु करण्यात आली आहे. एव्हढी खबरदारी घेतल्यावर देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. या कैद्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. 
....
https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख