8 lacs froud by employee in NCP leader Mandale shop | Sarkarnama

निवडणुकीच्या परिचयातून "राष्ट्रवादी'च्या नेत्याला लाखोंचा चुना!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

विधानसभा निवडणूकीसाठी नोकरीस ठेवलेल्या कर्मचाऱ्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते लक्ष्मण मंडाले यांना चागंलाच आर्थीक "हात की सफाई' दाखवली आहे. त्यांनी त्याला आपल्या भगवती गॅस एजन्सीजमध्ये नोकरीस ठेवले. दुकानाच्या वसुलीचे काम करतांना या कर्मचाऱ्यांने लाखो रुपयांचा चुना लावला. 

नाशिक : विधानसभा निवडणूकीसाठी नोकरीस ठेवलेल्या कर्मचाऱ्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते लक्ष्मण मंडाले यांना चागंलीच "हात की सफाई' दाखवली आहे. निवडणुकीत केलेल्या कामाने त्यांचा या कर्मचाऱ्यावर विश्‍वास बसला होता. त्यामुळे त्यांनी त्याला आपल्या भगवती गॅस एजन्सीजमध्ये नोकरीस ठेवले. येथे वसुलीचे काम करतांना या कर्मचाऱ्यांने लाखो रुपयांची वसुली केली. मात्र ती जमा न करताच पसार झाल्याने यासंदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

श्री. मंडाले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आहेत. त्यांचा मुलगा सिद्धांत लक्ष्मण मंडाले याने विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देवळाली मतदारसंघातून उमेदवारी केली होती. यावेळी निवडणूकीच्या निमित्ताने संपर्कात आलेल्या पुष्कर बापू पाटील या युवकाला त्यांनी नोकरीस ठेवले होते. श्री. मंडाले यांची यांची इंदिरानगर येथे भगवती गॅस एजन्सी आहे. पुष्कर पाटील त्यांच्याकडे नोकरीस होता. भगवती एजन्सीजकडून विविध मिठाईच्या दुकानदार व अन्य व्यावसायिकांकडे स्वयंपाकाच्या गॅसचा उधारीवर पुरवठा केला जातो. त्यानंतर काही कालावधीनंतर त्या पैशांची वसुली केली जाते. ही सर्व कामाची पद्धत माहित झाल्यावर पुष्कर याने विविध विक्रेत्यांचा विश्‍वास संपादन केला. स्वयंपाकाचा गॅस पुरवठा केलेल्या या दुकानांतून वेळोवेळी रोख रक्कम वसुल केली. त्याच्या परस्पर पावत्याही दिल्या. मात्र हे पैसे त्याने दुकानात जमा केले नाही. मदीना केटरर्स नावाने अमोल शेळके यांच्याकडून युनियन बॅंक सातपूर शाखेचा धनादेश घेतला. हा सर्व प्रकार गॅंसच्या हिशेबाची पडताळणी केल्यावर श्री. मंडाले यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याची चौकशी केली. तेव्हा पुष्कर याने एका राजकीय नेत्याच्या मध्यस्थीने त्याच्या कडे असलेली दोन पावती पुस्तके जमा केली. त्यातही त्याने काही पावत्या परस्पर दिलेल्या आढळल्या. मात्र यावेळी त्याने पैसे जमा करण्याचे आश्‍वासन देऊन देखील भगवती गॅस एजन्सीजमध्ये पैसे जमा केले नाही. 

दोन महिन्यांपूर्वी एका विक्रेत्याचा पासष्ट हजारांचा धनादेश वटला नाही. तेव्हा संबंधीत विक्रेत्याने रोख रक्कम घेण्यासाठी निरोप दिला. यावेळी पुष्कर पाटील याला पाटविण्यात आले. पुष्करने संबंधी दुकानातून पासष्ट हजार रुपये घेतले. मात्र त्यानंतर तो कामावर आला नाही. त्यामुळे दुकानातील हिशेब तपासणीसांनी माहिती घेतल्यावर हा मोठा घोटाळा उघडकीस आला.त्यानंतर श्री. मंडाले यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी श्री. पाटील याला ताब्यात घेतले आहे. 
... 
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख