नाशिकला नेते मंडळी अलिप्त, 68,000 मूर्तींचे विसर्जन; 6 जण बुडाले ! 

जिल्ह्यात गणेश विसर्जन शांततेत पार पडले. 232 सार्वजनिक व अडुसष्ट हजार 377 खाजगी गणपती मूर्तींचे विसर्जन झाले. यंदा कोरोनाच्या सावटात झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांशिवाय झाले. त्यामुळे नेहेमीचा दणदणाट नव्हता.
नाशिकला नेते मंडळी अलिप्त, 68,000 मूर्तींचे विसर्जन; 6 जण बुडाले ! 

नाशिक : जिल्ह्यात गणेश विसर्जन शांततेत पार पडले. 232 सार्वजनिक व अडुसष्ट हजार 377 खाजगी गणपती मूर्तींचे विसर्जन झाले. यंदा कोरोनाच्या सावटात झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांशिवाय झाले. त्यामुळे नेहेमीचा दणदणाट नव्हता. राजकीय मंडळी, आमदार, खासदार मंडळीही त्यापासून अलिप्तच राहिले. जिल्ह्यात विसर्जनादरम्यान पाच जणांचा  नदीत बुडाल्याने मृत्यू झाल्याने विसर्जनाला दुःखाची किनार होती. 

कालच्या विसर्जना दरम्यान विविध भागात सहा जणांचा बुडून मृत्यू झाला. यामध्ये, देवळाली गाव येथे नरेश नागेश कोळी (वय 40) आणि तेथून जवळच वालदेवी- दारणा संगमावर अजिंक्‍य राजाराम गायधनी (वय 21) यांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. अन्य एकाला वाचविण्यात नागरिकांना यश आले. हट्टीपाडा (त्र्यंबकेश्‍वर) येथे शिवराम सोमा निंबारे या युवकाचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. देवळा येथे विहिरीत गणेश विसर्जन करतांना प्रशांत वसंत गुंजाळ (वय 28) याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. पिंपळगाव बसवंत येथे रवींद्र (टिपू) रामदास मोरे हा कादवा नदीपात्रात बुडाला. नागरिकांना त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. ठाणगाव येथे म्हाळूंगी नदीपात्रात गमेशमूर्ती विसर्जन करतांना ओमकार काकड (वय 14) या मुलाचे निधन झाले. या दुर्घटनांत सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेची किनार कालच्या गणेश विसर्जनाला लागली आहे. 

गणेश विसर्जनासाठी गंगापूर धरणातून 1080 क्‍युसेक्‍स पाणी सोडण्यात आले होते. शहरात अडुसष्ट हजार 377 गणपती मूर्तींचे विसर्जन झाले. त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यात अकरा ठिकाणी  एक गाव एक गणपती हा उपक्रम झाला. देवळा येथे अठरा सार्वजनिक गणपतींचा उपक्रम झाला. येथे दुपारीच विसर्जन कार्यक्रम आटोपला. निफाडला अठरा ठिकाणी गणेश विसर्जन झाले. सिन्नर तालुक्‍यात देखील एकोणीस ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जन झाले. 

शहरात मूर्ती दान उपक्रम जोरात
नाशिक महानगरपालिकेने यंदा विशेष मोहिम राबवून गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्यासाठी शहराच्या विविध भागात मूर्ती दान करण्याची  व्यवस्था केली होती. प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींचे विघटन होण्यासाठी रसायन उपलब्ध करण्यात आले होते. गोदावरी, वालदेवी, दारणा, नासर्डी यांसह विविध ठिकाणी मूर्ती दान करण्याची व्यवस्था केली होती.

पर्यावरणपुरक विसर्जन करण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तींच्या विघटनासाठी महानगरपालिकेने मोफत अमोनियम बायोकार्बोनेट पावडर वितरणाची व्यवस्था केली होती. पंचवटी येथे एक हजार 915 किलो, नाशिक पश्‍चिम भागात 874 किलो, नाशिक पुर्व विभागात 789 किलो, सातपूर विभागात एक हजार 670 किलो, सिडको परिसरात एक हजार 652 किलो, नाशिकरोड भागात दोन हजार 15 किलो असे आठ हजार 915 किलो अमोनियम बायोकार्बोनेट पावडरचे नागरिकांना वितरण झाले. याशिवाय राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून स्थानिक पातळीवरच मूर्ती दान करण्याचे तसेच काही भागात कृत्रीम तलावांद्वारे गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिककरांनी कृत्रिम तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन केले. सिडको विभागात संभाजी स्टेडियम येथे मोठ्या प्रमाणात मूर्ती संकलनाचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला. अशी माहिती विभागीय अधिकारी डॉ. मयुर गुलाबराव पाटिल यांनी दिली. 
... 
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=yI8jA-otL_gAX-NLBn6&_nc_ht=scontent.fdel1-3.fna&oh=0e3c66a7a46f2a7bff708acd26eafd81&oe=5F743727

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com