दिलासा...नाशिक जिल्ह्यात आजवर ६१ हजार ३३९ रुग्ण कोरोनामुक्त

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या एकसष्ट हजार ३३९ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी प्रशासन अतिशय सतर्क आहे. त्यासाठी पालकंमत्र्यांकडून नियमितपणे तालुकानिहाय आढावा बैठक घेतली जात आहे.
दिलासा...नाशिक जिल्ह्यात आजवर ६१ हजार ३३९ रुग्ण कोरोनामुक्त

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या एकसष्ट हजार ३३९ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी प्रशासन अतिशय सतर्क आहे. त्यासाठी पालकंमत्र्यांकडून नियमितपणे तालुकानिहाय आढावा बैठक घेतली जात आहे. नाशिक शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने वैद्यकीय पथकांवरील ताण वाढला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील एकसष्ट हजार ३३९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत सात हजार ६८३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत एक हजार २७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली. 

नाशिक शहरात  एक हजार ५७ रुग्ण

नाशिक शहरात शुक्रवारी एक हजार ५७ बाधीत रुग्ण आढळले. शहरात आत्तापर्यंत  दोन हजार १२१ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार शहरात सत्तेचाळीस हजार ९०० कोरोना बाधीत रुग्ण आहेत. शहरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या ६९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शुक्रवारी निधन झालेल्या १५ रुग्णांचा समावेष आहे. शहरातील विविध रुग्णालयांत उपचार केलेल्या त्रेचाळीस हजार १९० रुग्णांना  घरी सोडण्यात आले आहे. शहरात सध्या चार हजार १६ कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार गेत आहेत.

नाशिक जिल्ह्यात सात  हजार २९७ 

सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात संसर्ग सुरुच असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण असे, नाशिक ४५५, चांदवड ११६, सिन्नर ४४८, दिंडोरी १७३, निफाड  ६५९, देवळा ६०,  नांदगांव २४८, येवला ६०, त्र्यंबकेश्वर ९५, सुरगाणा २७, पेठ २३, कळवण ८५,  बागलाण १९०, इगतपुरी १५०, मालेगांव ग्रामीण २४९ असे एकूण ३ हजार ३८  पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४ हजार १६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ५२७  तर जिल्ह्याबाहेरील १०२ असे सात  हजार २९७  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  आजपर्यंत जिल्ह्यात  ७०  हजार २९७  रुग्ण आढळून आले आहेत.

बरे होण्याचे प्रमाण ८७.२६ टक्के

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी समाधानकारक असल्याचा विश्वास वैद्यकीय अधिकारी व्यक्त करीत आहेत. जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिकच्या ग्रामीण भागात ८१.२७  टक्के, नाशिक शहरात ९०.१७ टक्के, मालेगावमध्ये  ८१.१२  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७०.३९ टक्के आहे. जिल्ह्यात बरे होण्याचे सरासरी प्रमाण ८७.२६ इतके आहे. आजवर बाधीत आढळलेल्या सत्तर  हजार २९७ कोरोनाबाधित रुग्णांपैकी एकसष्ट हजार ३३९ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
....
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com