उत्तर महाराष्ट्रात कोरोनामुळे 48 पोलिसांचा मृत्यू! - 48 cops died in North maharashtra due to covid-19 | Politics Marathi News - Sarkarnama

उत्तर महाराष्ट्रात कोरोनामुळे 48 पोलिसांचा मृत्यू!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

उत्तर महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव सातत्याने वाढतो आहे. विभागात पॉझिटिव्ह नागरिकांची संख्या एक लाख १६ हजारांच्या पुढे पोचली असताना सामान्यांची काळजी घेण्यात रस्त्यावर असणारे पोलिसही यात मागे नाहीत.

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव सातत्याने वाढतो आहे. विभागात पॉझिटिव्ह नागरिकांची संख्या एक लाख १६ हजारांच्या पुढे पोचली असताना सामान्यांची काळजी घेण्यात रस्त्यावर असणारे पोलिसही यात मागे नाहीत. तब्बल दोन हजार ३५२ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. दुर्दैव म्हणजे आतापर्यंत उत्तर महाराष्ट्रात शहर-ग्रामीण मिळून तब्बल ४८ पोलिसांचे बळी कोरोनामुळे गेले आहेत.

विभागात कोरोनाचा प्रभाव सातत्याने वाढतो आहे. आतापर्यंत एक लाख १६ हजार ६४९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात, बंदोबस्तावरील पोलिसांचे प्रमाण वाढत आहे. विभागातील दोन हजार ३५२ पोलिसांना लागण झाली असून, मृत्यू वाढत आहेत. त्यामुळे बंदोबस्‍ताशिवाय पोलिस दलाला त्यांच्या पोलिसांच्या कोरोना प्रतिबंधाच्या उपायांवर लक्ष केंद्रित करावे लागत आहे. उत्तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नगर २७ हजार १०९, जळगाव ३४ हजार ४४५, नाशिक ग्रामीण १० हजार १६८, धुळे १० हजार २४४, नंदुरबार तीन हजार ३६२, नाशिक शहर ३१ हजार ३२१ याप्रमाणे एक लाख १६ हजार ६४९ कोरोनाबाधित सापडले आहेत. वाढत्या प्रभावासोबत रस्त्यावर काम करणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षेवर यंत्रणांनी भर दिला आहे. नाशिक शहरात पोलिसांसाठी १०० बेडचे कोरोना सेंटर सुरू होत आहे. परिक्षेत्रासाठी २५ बेडचे कोरोना सेंटर सुरू होत असून, इतर जिल्ह्यात आढावा घेतला जात आहे.

जळगावला सर्वाधीक मृत्यू
नाशिक विभागात कोरोना विरोधातील लढाईत पोलिसांनी प्रारंभापासून आघाडी घेतली होती. त्यात राज्य राखीव दलाचीही त्यांना साथ मिळाली. मात्र कोरोना विरोधात लढताना अनेक पोलिसांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र त्यात काहींचा मृत्यू झाला. यामध्ये नगर १४, जळगाव १७, नंदुरबार ४, नाशिक शहर ३, नाशिक ग्रामीण ३, धुळे ७, नंदुरबार ४ असे परिक्षेत्रात ४८ जणांचे निधन झाले. 
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख