नाशिक जिल्ह्यात ४१ हजार ६३४  रुग्ण कोरोनामुक्त - 41,634 corona patients recover in nashik district | Politics Marathi News - Sarkarnama

नाशिक जिल्ह्यात ४१ हजार ६३४  रुग्ण कोरोनामुक्त

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

आगामी काळात कोरोनाचा संसर्ग अधिक गंभीर स्थितीत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन विशेष सतर्क झाले आहे.

नाशिक : आगामी काळात कोरोनाचा संसर्ग अधिक गंभीर स्थितीत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन विशेष सतर्क झाले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४१  हजार ६३४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

सद्यस्थितीत १० हजार ८१८ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत १०६४  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अशी, नाशिक ५५५, चांदवड १७०, सिन्नर ५६२, दिंडोरी ९९, निफाड  ८६८, देवळा ८२,  नांदगांव ४५१, येवला ११४, त्र्यंबकेश्वर ५०, सुरगाणा २, पेठ ९, कळवण ७०,  बागलाण २९९, इगतपुरी १५७, मालेगांव ग्रामीण ३३८ असे तीन हजार ८८१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महापालिका क्षेत्रात सहा हजार २८१, मालेगांव महापालिका क्षेत्रात ६३८  तर जिल्ह्याबाहेरील १८ असे एकूण दहा हजार ८१८  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  आजपर्यंत जिल्ह्यात  त्रेपन्न हजार ५१६  रुग्ण आढळून आले आहेत.

बरे होण्याची प्रमाण ८३.२१ टक्के 
जिल्हयात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे.  अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ही स्थिती सुधारते आहे. नाशिक जिल्ह्यात ६८.६१,  टक्के, नाशिक शहरात ८१.२८ टक्के, मालेगावमध्ये  ७५.८१  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८३.२१ टक्के आहे. जिल्ह्यात बरे होण्याचे सरासरी प्रमाण ७७.८०  इतके आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३१८, नाशिक महापालिका क्षेत्रातून  ५९४ तसेच मालेगांव महापालिका क्षेत्रातून १२६  व जिल्हा बाहेरील २६ अशा एक हजार ६४  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
...

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख