"मिशन झिरो नाशिक" मोहिमेत सापडले ३,३३२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 

"मिशन झिरो नाशिक" मोहिम सुरु आहे. या एकात्मिक कृती योजनेत गेल्या वीस दिवसांत एकोणतीस हजार ६७ कोरोना चाचण्या झाल्या. यामध्ये तीन हजार ३३२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
"मिशन झिरो नाशिक" मोहिमेत सापडले ३,३३२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 

नाशिक : महानगरपालिका, भारतीय जैन संघटना आणि विविध स्वयंसेवी संघटनांच्या वतीने "मिशन झिरो नाशिक"  मोहिम सुरु आहे. या एकात्मिक कृती योजनेत गेल्या वीस दिवसांत एकोणतीस हजार ६७ कोरोना चाचण्या झाल्या. यामध्ये तीन हजार ३३२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना नियंत्रणाला मोठा हातभार लागला आहे.

शहराच्या विविध भागात आज झालेल्या या तापसण्यांत एक हजार ३१३ नागरिकांनी चाचण्या करून घेतल्या. यामध्ये १६८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. या तापसणीत लक्षणे असलेल्या तसेच वयस्कर व इतर आजारी असलेल्या नेमक्या व्यक्तींची तपासणी केली जाते. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध घेता येतो. या रुग्णांना लवकर शोधून काढणे, लगेच उपचार करणे, आयुर्वेदिक काढा देणे, समुपदेशन करणे, रुग्णांचा पाठपुरावा करणे, कुटुंबातील व संपर्कातील इतर सदस्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करणे यामुळे हे रुग्ण लवकर बरे होऊन त्यांना  शारिरीक व मानसिक बळ मिळते. पुढील संक्रमण थांबविण्यात मिशन झिरो नाशिक अभियानाला मोठ्या प्रमाणावर यश येत आहे. रुग्ण गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात येण्याचे प्रमाण झपाट्याने कमी झाल्याचे आढळले आहे. 

महापालिकेच्या सहाही विभागातील विविध परिसरातून तेवीस मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनद्वारे तपासणी सुरु आहे. पॉझिटिव्ह रुग्ण शोधून काढण्यात, फिल्डवरील आरोग्य कर्मचाऱ्यांना व कार्यकर्त्यांना यश आले आहे. मिशन झिरो नाशिक करिता २२५ च्यावर कर्मचारी व कार्यकर्त्यांची टीम कार्यरत आहे. त्याचबरोबर प्लाझ्मा डोनर्स जीवनदाता योजनेअंतर्गत कोरोनावर यशस्वी मात केलेल्या व्यक्ती आपल्या रक्तातील प्लाझमा दान देण्यासाठी पुढे येत  आहेत. स्वतःहून संमतीपत्र देत आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत यशस्वी झालेल्या १८ ते ५५ वयोगटातील, अन्य मोठे आजार नसलेल्या व्यक्तींच्या रक्तातील प्लाझ्मा इतर कोरोना रुग्णांना दिला जाणार आहे.     

आजच्या मिशन झिरो नाशिक मध्ये महानगरपालिका चे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, पोलीस आयुक्तालय, भारतीय जैन संघटनेचे कार्यकर्ते यांच्या बरोबरीने सैफी ऍम्बुलन्स कॉर्पसचे सेवाभावी कार्यकर्ते, नाशिकरोड गुरुद्वारा, किशोर सूर्यवंशी इंटरनॅशनल स्कूल, एस. के. डी. इंटरनॅशनल स्कूल, व्हिजन अकॅडमी, साधना फाऊंडेशन, मातोश्री ट्रॅवल्स, एस्पिलियर स्कूल, डॉक्टर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्नीसिएन, शिक्षक, स्थानिक सामाजिक व  राजकीय कार्यकर्ते अशा विविध संस्थांचे सहकार्य लाभत आहे, असे आयुक्त राधाकृष्ण गमे, भारतीय जैन संघटनेचे प्रकल्प प्रमुख नंदकिशोर साखला, कार्यकारी अभियंता सी. बी. आहेर, वैद्यकीय अधिकारी डॉ अजिता साळुंके  यांनी सांगितले. 
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=_qv_SXSxylAAX8XskD5&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=556a6a7fbf378b8838d39531d2454104&oe=5F5887A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com