30 lacs needy people took the shivbhojan in state | Sarkarnama

शिवभोजनातून राज्यात ३० लाख व्यक्तींनी दिला तृप्तीचा ढेकर!   

संपत देवगिरे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

राज्यात जुलैमध्ये ८७८ शिवभोजन केंद्रांतून पाच रुपये प्रतिथाळी याप्रमाणे ३० लाख तीन हजार ४७४ गरीब व गरजू लोकांनी शिवभोजनाचा लाभ घेतल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

नाशिक : राज्यात जुलैमध्ये ८७८ शिवभोजन केंद्रांतून पाच रुपये प्रतिथाळी याप्रमाणे ३० लाख तीन हजार ४७४ गरीब व गरजू लोकांनी शिवभोजनाचा लाभ घेतल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

ते म्हणाले, राज्यात एप्रिलमध्ये २४ लाख ९९ हजार २५७, मेमध्ये ३३ लाख ८४ हजार ०४०, जूनमध्ये ३० लाख ९६ हजार २३२, जुलैमध्ये ३० लाख तीन हजार ४७४ आणि असे एकूण १ एप्रिल ते ३१ जुलै यादरम्यान एक कोटी १९ लाख ८३ हजार तीन गरीब व गरजू लोकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला आहे. 

श्री. भुजबळ म्हणाले, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब आणि शेतकरी लाभार्थी अशा रेशनकार्डवरील सात कोटी ४९ लाख नागरिकांपैकी सहा कोटी ५२ लाख ३२ हजार ४४८ लाभार्थ्यांना २० लाख ७२ हजार १०४ क्विंटल गहू, १५ लाख ९६ हजार ७९८ क्विंटल तांदळाचे वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रतिलाभार्थी प्रतिमहिना पाच किलो अन्नधान्य (गहू व तांदूळ) मोफत देण्याच्या योजनेमधून जुलैसाठी आतापर्यंत १९ लाख ९७ हजार ४७४ क्विंटल गहू आणि तांदळाचे वाटप झाले. स्थलांतरित झालेले; परंतु लॉकडाउनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे तीन लाख ७१ हजार ४८२ शिधापत्रिकाधारकांमार्फत ते जेथे राहत आहेत, तेथे पोर्टबिलिटी यंत्रणेंतर्गत अन्नधान्याची उचल केली आहे. 

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेबाबत ते म्हणाले, या योजनेतून प्रतिलाभार्थी प्रतिमहिना पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येतो. या योजनेमधून जूनसाठी आतापर्यंत ३२ लाख ४३५ क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे. कोविड-१९ संकटावरील उपाययोजनेसाठी तीन कोटी आठ लाख ४४ हजार ७६ एपीएल केसरी शिधापत्रिका असलेल्या लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू आठ रुपये प्रतिकिलो व तांदूळ १२ रुपये प्रतिकिलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे आतापर्यंत १३ लाख चार हजार ४६ क्विंटल मे व जूनसाठी वाटप केले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रतिरेशनकार्ड एक किलो तूर किंवा हरभराडाळ मोफत देण्याची तरतूद आहे. आतापर्यंत या योजनेतून सुमारे तीन लाख ८९ हजार ७९२ क्विंटल डाळीचे एप्रिल ते जूनसाठी वाटप केले आहे. 
...
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख