कळवणच्या  बहुतांशी ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा - 24 out of 29 Village sarpanch is from NCP. Nashik Politics. | Politics Marathi News - Sarkarnama

कळवणच्या  बहुतांशी ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

तालुक्यात एकोणतीस ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत कामगिरी केली आहे. आमदार नितीन पवार व अन्य पदाधिकारी यांच्या प्रयत्नांना चांगला पर्तिसाद मिळाला.

कळवण : तालुक्यात एकोणतीस ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत कामगिरी केली आहे. आमदार नितीन पवार व अन्य पदाधिकारी यांच्या प्रयत्नांना चांगला पर्तिसाद मिळाला. नांदुरीसह 24 ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवला, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी दिली.

काँग्रेस, शिवसेना, भाजपा, माकपा यांचे देखील काही ग्रामपंचायतवर पदाधिकारी विजयी झाले. सरपंच व उपसरपंच निवडणुकीत विरशेत येथे दोन गटात मारहाण व्यतिरिक्त सर्वत्र शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक संपन्न झाल्या.  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पवार यांनी या निवडणुकातं विशेष लक्ष घातले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत मोठी आघाडी घतेली. पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांसाठी त्याचा पक्षाला चांगला लाभ होईल असा विश्वास पदाधिका-यांनी व्यक्त केली.  या तालुक्यावर (कै) माजी मंत्री ए. टी. पवार यांच्यापासून प्रदिर्घ काळ याच कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. सध्या त्याचे चिरंजीव नितीन पवार आमदार आहेत. यांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्य जिल्हा परिषदेच्या तीन गटांत विजयी झाले होते. ग्रामपंचायतींच्या सरपच, उपसरंपचांच्या निवडमुकांतही तोच ट्रेंड कायम राहील असे चित्र आहे.  

तालुक्यातील 29 ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंचपदाच्या झालेल्या निवडणूकीत कनाशी सरपंचपदी बंडू पवार , उपसरपंच सुनीता बोरसे , अभोणा सरपंचपदी सुनीता पवार , उपसरपंच भाग्यश्री बिरारी , ओतूर सरपंचपदी पार्वता गांगुर्डे , उपसरपंच मंगेश देसाई , मेहदर सरपंचपदी शहानू राऊत , उपसरपंच प्रकाश बंगाळ यांची निवड झाली. मुळाणे सरपंचपदी पुष्पा ठाकरे , उपसरपंच - शांताराम ठाकरे , कळमथे सरपंचपदी अरुण वार्डे , उपसरपंच मनीषा वाघ , नांदुरी सरपंचपदी सुभाष राऊत , उपसरपंच ताराचंद चौधरी , बोरदैवत सरपंचपदी कविता चव्हाण , उपसरपंच रामदास गावित यांची निवड झाली.
पाळे बु .सरपंचपदी नंदू निकम , उपसरपंच सुधीर परदेशी , देवळीवणी सरपंचपदी लताबाई चव्हाण , उपसरपंच पंकज चव्हाण , भुसणी सरपंचपदी सुकदेव पवार , उपसरपंच दीपक खैरनार , कुंडाणे(क) सरपंचपदी गौरी ठाकरे , उपसरपंच देवेंद्र ढुमसे , मोहमुख सरपंचपदी अनिता काळे , उपसरपंच भगवान जाधव यांची निवड झाली.
ओझर सरपंचपदी रमेश भोये , उपसरपंच धनश्री भोये , सावकी पाळे सरपंचपदी सुनीता बंगाळ , उपसरपंच रेखा गायकवाड , बिलवाडी सरपंचपदी मोहिनी साबळे , उपसरपंच माधव गायकवाड , काठरे दिगर सरपंचपदी विजय गायकवाड , उपसरपंच रत्ना भोये यांची निवड झाली.
गोसराणे सरपंचपदी कैलास थैल, उपसरपंच मुरलीधर मोरे , भगुर्डी सरपंचपदी दत्तात्रेय गवळी , उपसरपंच आशा देवरे, नरूळ सरपंचपदी प्रमिला भोये , उपसरपंच महादू चौधरी , तताणी सरपंचपदी वंदना राऊत , उपसरपंच भारती भोये , लिंगामे सरपंचपदी गुलाब पालवी , उपसरपंच राधाबाई पालवी यांची निवड झाली. तसेच वडाळा (हा ) सरपंचपदी सुवर्णा गावित , उपसरपंच पुंडलिक गावित , जामले ( वणी ) सरपंचपदी ललिता भरसट , उपसरपंच धनराज ठाकरे , मोहनदरी सरपंचपदी जयश्री चव्हाण , उपसरपंच कैलास चव्हाण , पळसदर सरपंचपदी उज्ज्वला कवर ,उपसरपंच छबूनाथ कवर बापखेडा सरपंचपदी सुनील चौधरी , उपसरपंच - जयश्री साबळे यांची निवड करण्यात आली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख