दिल्लीतील आंदोलनाला २१ हजार शेतकऱ्यांचा पाठिंबा

शेतकरीविरोधी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होऊ शकत नसले म्हणून काय झाले, उघडपणे पाठिंबा तर देऊ शकतो, या हेतूने जिल्ह्यात ‘एक सही शेतकऱ्यांसाठी’ या उपक्रमांत २१ हजार शेतकऱ्यांनी आपल्या सह्यांद्वारे या आंदोलनाला पाठिंबा दिला.
Rashtra seva Dal
Rashtra seva Dal

येवला : शेतकरीविरोधी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होऊ शकत नसले म्हणून काय झाले, उघडपणे पाठिंबा तर देऊ शकतो, या हेतूने जिल्ह्यात ‘एक सही शेतकऱ्यांसाठी’ या उपक्रमांत २१ हजार शेतकऱ्यांनी आपल्या सह्यांद्वारे या आंदोलनाला पाठिंबा दिला. याबाबतचे पत्र तहसीलदारांना देण्यात आले.

राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात राष्ट्र सेवा दल, छात्रभारती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शेतकरी पंचायत, अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा व समविचारी संघटनांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ स्वाक्षऱ्यांची मोहीम राबवली. जिल्ह्यात प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली १६ ते २५ फेब्रुवारीदरम्यान शेतकरीविरोधी कायद्याबद्दल जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी या कायद्याला विरोध दर्शवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

केंद्र सरकारने केलेले तीन्ही कृषी कायदे शेतक-यांच्या हिताचे नाहीत. हे कायदे रद्द करण्यासाठी हे शतकरी शंभर दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. मात्र केंद्रातील सरकार त्यावर तोडगा काढण्यास तयार नाही. भारताच्या इतिहासात अशाप्रकारे लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे शेतकरी व त्यांच्या आंदोलनाची अशी हेटाळणी कधीही झाली नाही. सरकारचा हा उद्दामपणा आहे त्याचा आता नागरिकांनी विचार करुन त्याचा जाब विचारला पाहिजे, असे आवाहन श्री. कोकाटे यांनी यावेळी केले. 
या सह्या संकलनासाठी प्रामुख्याने येवला, मालेगाव, नांदगाव, निफाड, सिन्नर, चांदवड, जव्हार, मोखाडा, नाशिक शहर, दिंडोरी या भागात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यातून प्रत्यक्ष स्वाक्षरी मोहिमेत सहभागी झालेले एकूण २१ हजार शेतकरी असून, त्यांनी शेतकरी कायद्याला स्वाक्षरी देत विरोध केला आहे.

स्वाक्षरी मोहिमेत नितीन मते, जिल्हा कार्याध्यक्ष दिनकर दाणे, सरपंच सुनंदा काळे, ॲड. शरद कोकाटे, समाधान बागूल, सुधा कोकाटे, मंदा पडवळ, संगीता जगताप, पुंजाराम काळे, गणेश गाडे, भाऊसाहेब जगताप, संतोष गायकवाड, पंडित मढवई, रामनाथ पाटील, कानिफ मढवई, बाबासाहेब कोकाटे, कविता झाल्टे, उषा शिंदे, दौलत वाणी, बाळासाहेब चव्हाण, उतम बंड, राजेंद्र जाधव, दिलीप कचरे, उत्तम खांडेकर, सुकदेव आहेर, शरद शेजवळ, हेमंत पाटील, पांडुरंग चव्हाण आदींनी सहभाग घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com