2019 nashik district broaken 52 years voting Record | Sarkarnama

ग्रेट जॅाब...गतवर्षी नाशिकने मतदानाचा 52 वर्षांचा विक्रम मोडला !

संपत देवगिरे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

लोकसभा, विधानसभेची निवडणुक शांततेत, यशस्वीपणे पार पाडली. या विशेष प्रयत्नामुळे लोकसभेच्या 2019 मधील सार्वत्रिक निवडणूकीत गेल्या 52 वर्षातील विक्रमी मतदान झाले. सर्वाधिक मतदानाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला.  

नाशिक : निवडणूक विभागाने गतवर्षी मोठ्या प्रमाणावर तरुण, नवीन मतदारांची नोंदणी केली. ही नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट केली. हे अतिशय महत्त्वाचे होते, कारण याच वर्षी लोकसभा, विधानसभेची निवडणुक शांततेत, यशस्वीपणे पार पाडली. या विशेष प्रयत्नामुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये गेल्या 52 वर्षातील विक्रमी मतदान झाले, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. 

महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यासंद्रभात ते म्हणाले, गतवर्षी सरासरी 157 टक्के पाऊस झाला. नांदूरमधमेश्वर येथून आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा विसर्ग होऊनही योग्य नियोजनामुळे मनुष्यहानी टाळण्यात यश आले.  

ते म्हणाले, मागील वर्षी जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ सर्वेक्षण करून पंचनामे करण्यात आले. त्यामुळे 6.82 लाख शेतकऱ्यांना 578 कोटी रुपये नुकसान भरपाई थेट बँक खात्याद्वारे अदा करण्यात आली. 4.58 लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून 273 कोटी रुपये अनुदान वितरित झाले, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. प्रशासनाच्या पुरवठा विभागाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील रेशनकार्डधारकांना विविध योजनांचे वर्षभरात एकूण वीस हजार 538 मेट्रिक टन  धान्य वाटप झाले. जिल्ह्यात तेरा शिवभोजन केंद्राची सुरुवात झाली. गरीब व गरजू नागरिकांना शिवभोजन थाळीचा लाभ देण्यात आला. 

जिल्हाधिकारी म्हणाले, शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत जिल्ह्यातील 2.02 लाख निराधार, गरीब, अपंग, ज्येष्ठ नागरिकांना विविध सामाजिक अर्थसहाय्य योजनांमध्ये 296 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला. जिल्हा प्रशासनातर्फे लोकसेवा हमी कायदा 2015 या अंतर्गत 101 सेवांचा सेवा हमी कायद्यामध्ये अधिसूचित करण्यात आले. त्याचा लाभ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर झालेला आहे . एवढ्या मोठ्या संख्येने सेवांची हमी देणारा नाशिक महाराष्ट्रातील पहिलाच जिल्हा आहे . याबाबत राज्याचे सेवा हमी मुख्य आयुक्त  स्वाधीन क्षत्रिय यांनी जिल्हा प्रशासनाचा विशेष गौरव केला आहे.
....
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख