नाशिकला 14 हजार गुन्हे; मात्र कोरोना रामेश्वरी, दंडवसुली सोमेश्वरी! - 14 K crime register in nashik regarding CORONA | Politics Marathi News - Sarkarnama

नाशिकला 14 हजार गुन्हे; मात्र कोरोना रामेश्वरी, दंडवसुली सोमेश्वरी!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 जुलै 2020

संचारबंदीचा भंग केल्याने चौदा हजार नागरीकांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र ही कारवाई म्हणजे कोरोना रामेश्वरी व दंडाची कारवाई सोमेश्वरी अशी आहे. त्यामुळे नागरिक त्याला वैतागले आहेत.

नाशिक : कोरोना आटोक्‍यात येत नसल्याने पोलिसांनी पुन्हा जमावबंदी व संचारबंदी उल्लंघन करणा-यांवर गुन्हे दाखल करण्याची मोहिम सुरु केली आहे. संचारबंदीचा भंग केल्याने चौदा हजार नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र ही कारवाई म्हणजे कोरोना रामेश्वरी व दंडाची कारवाई सोमेश्वरी अशी आहे. त्यामुळे नागरिक त्याला वैतागले आहेत. 

शहर पोलिसांनी जमावबंदी व अन्य आदेशाची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईत मास्क न वापरणाऱ्या एक हजार 455 नागरिकांवर कारवाई केली असून, संचारबंदीच्या भंगाबद्दल 14 हजार 484 जणांवर कारवाया करण्यात आल्या. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. 
कोरोनाचा शहरात प्रादुर्भाव वाढत असताना संचारबंदीचे सक्‍तीने पालन करण्याच्या सूचना प्रशासकीय यंत्रणेने दिल्या होत्या. तरीदेखील सायंकाळी सातनंतर शहर परिसरात संचार वाढत असल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. रविवारी दिवसभरात संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 956 नागरिकांवर अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या 499 नागरिकांवर गुन्हे दाखल झाले असून, आतापर्यंत सहा हजार 692 नागरिकांवर कारवाई झाली आहे. दुचाकीवर डबलसीट फिरणाऱ्यांसह चारचाकी वाहनांत तीनपेक्षा अधिक प्रवासी असल्याने अशा वाहनचालकांवरही कारवाई केली आहे. 25 मार्चपासून वाहतूक शाखेने आतापर्यंत केलेल्या कारवाईत तब्बल एक कोटी दोन लाख 88 हजार 300 रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यापैकी 12 लाख 56 हजारांची वसुली झाली आहे. 

मात्र शहरात सध्या कोरोनाचा संसर्ग आणि जमावबंदीपासून तर वाहतूक नियमांचे उल्लंघन प्रामुख्याने नाशिक पूर्व भागात होते. शहरातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण या भागात आहेत. येथे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. मात्र पोलिसांनी येथे अपवाद वगळता फारशी कारवाई केलेली दिसत नाही. पोलिसांची ही धडक मोहिम गंगापुर रोड, सरकारवाडा, नाशिक रोड, मुंबई नाका या पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात झाली आहे. यामध्ये नागरीकांची तपासणी करतांना त्यांची माहिती घेऊन थेट त्यांच्या नोटीस दिल्याच्या फॅार्मवर सह्या घेतल्या जातात. त्यामुळे अनेकांना त्याचे गांभिर्य कळत नाही. यासंदर्भात पोलिसांनी पंचवटी व नाशिक पूर्व विभागात कारवाई करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे बोलले जाते. पोलिस त्याबाबत काय करता, याची आता उत्सुकता आहे. 
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख