नाशिक : पंतप्रधान सहायता निधीतून कोरोनाग्रस्तांसाठी संकलीत केलेल्या निधीतून उपचारासाठी व्हेंटीलेटर उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यातून नाशिक जिल्ह्यासाठी १३८ व्हेंटीलेटर उपलब्ध झाले आहे. याशिवाय राज्य शासनाने १७ तर अन्य व्यवस्थेतून २३ व्हेंटीलेटर उपलब्ध करण्यात आले आहेत.
खासदार डॅा भारती पवार यांनी याबाबत सांगितले, की जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी शासनाच्या माध्यमातून विविध प्रयत्न सुरु आहेत. केंद्र शासनाने यासंदर्भात तातडीची गरज म्हणून व्हेंटीलेटर उपलब्ध केले आहे. पंतप्रधान सहायता निधीतून जिल्ह्याला १३८ व्हेंटीलेटर मिळाले आहे. त्याचे वितरण गरजेनुसार विविध शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या रुग्णालयांना करण्यात आले आहे.
जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयामार्फत त्याचे वितरण झाले. त्याचा विविध रुग्णालयांत उपयोग सुरु आहे. त्यातून विविध कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. उपलब्ध व्हेंटीलेटरची संख्या अशी, जिल्हा शासकीय शासकीय रुग्णालय ४१, कळवण ग्रामीण रुग्णालय ३६, चांदवड ग्रामीण रुग्णालय ११, सिन्नर ग्रामीण रुग्णालय २०, अभोना ग्रामीण रुग्णालय २३, नामपूर ग्रामीण रुग्णालय ५, डांग सौंदाने ग्रामीण रुग्णालय ५, त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालय ५, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे डॅा. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय ५, एसएमबीटी रुग्णालय ५, वणी प्राथमिक आरोग्य केंद्र १०, ग्रामीण रुग्णालय झोडगे २.
खासदार पवार म्हणाल्या, जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार सुरु झाला. त्यानंतर मार्च महिन्यात शासनाने लॅाकडाऊन जाहिर केले. त्यानतर मतदारसंघातील विविध भागात जाऊन आम्ही आढावा बैठका घेतल्या आहेत. तहसीलदार स्तरावर बैठक घेऊन आवश्यक ती मदत उपलब्ध व्हावी यासाठी पाठपुरावा केला. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते देखील यामध्ये सक्रीय होते. रुग्णांची तपासणी, औषधोपचार, रुग्णांना उपचारासाठी दाखल करणे, विविध शहरांत वैद्यकीय तपासणी आदी उपक्रम करण्यात आले आहेत.
...
https://scontent.fpnq7-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

