भाऊबीजेसाठी जमले १२५ सदस्य, त्यात ३५ भाऊ अन् ४२ बहिणी - 125 Family menbers came together for deewali celibration | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

भाऊबीजेसाठी जमले १२५ सदस्य, त्यात ३५ भाऊ अन् ४२ बहिणी

संपत देवगिरे
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

नोकरी, शिक्षण, व्यवसायासह विविध कारणांनी ग्रामीण भागातील कुटुंबांना स्थलांतर करावे लागते. त्यामुळे शहरासारखेच चौकोनी कुटुंबे ग्रामीण भागातही दिसू लागली आहेत. मात्र येथील सायखेडा (ता. निफाड) येथील कुटे कुटुंबीय मात्र यंदा भाऊबीजेसाठी सर्वांना एकत्र आले.

नाशिक : नोकरी, शिक्षण, व्यवसायासह विविध कारणांनी ग्रामीण भागातील कुटुंबांना स्थलांतर करावे लागते. त्यामुळे शहरासारखेच चौकोनी कुटुंबे ग्रामीण भागातही दिसू लागली आहेत. मात्र येथील सायखेडा (ता. निफाड) येथील कुटे कुटुंबीय मात्र यंदा भाऊबीजेसाठी सर्वांना एकत्र आले. यावेळी ३५ भावांना बेचाळीस बहिणींनी औक्षण करुन दिवाळ सणाचा आनंद द्विगुणीत केला. 

सध्याच्या पिढीत नात्यांचा ओलावा कमी होऊ लागला आहे. सध्याच्या पिढीत मामाचे गांव हरवले आहे. पण सायखेडा येथील कुटे परिवारातील सदस्यांनी एकत्र येत सलग चौथ्या  वर्षी सामुहिक भाऊबीज आनंदात साजरी केली. कुटे परिवारातील जगन कुटे, प्रमोद कुटे, राहुल कुटे, अक्षय कुटे, संजय कुटे, महेश कुटे, सागर कुटे, निलेश कुटे , दिपक कुटे आदींनी यंदाची भाऊबीज एकत्रित साजरी करण्याची संकल्पना मांडली. त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. यानिमित्ताने दोन दिवसीय कौंटुंबिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. पाडव्याच्या दिवशी लहान मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. बहीण व दाजी यांनी जीवनातील चांगले वाईट अनुभव यानिमित्ताने सर्वांना सांगितले. एकमेकांची ओळख करून देण्यात आली. दरवर्षी असेच यानिमित्ताने भेटण्याचे ठरले. भाऊबीजच्या दिवशी बहिणींनी सर्व भावांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी औक्षण केले. परिवाराचा भाऊबीजेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी परिवारातील ३५ भाऊ व ४२ बहिणींसह १२५ सदस्य उपस्थित होते. दरवर्षी अशीच भाऊबीज साजरी करण्याचा संकल्प देखील करण्यात आला. 

यासंदर्भात श्री. कुटे म्हणाले, आम्ही शेतकरी आहोत. त्यामुळे तीन पिढ्यांपासूनचे सगळे यानिमित्ताने एकत्र आले. परगावी गेल्यावर मोबाईल असला तरीही संपर्क निर्मळ, आपलुकीचा होतोच असा नाही. अनेकदा अडचणी येतात. त्यातून मार्ग काढावा लागतो. त्यात कुटुंबाचा आधार असावा. एकमेकांपासून दुरावले जाऊ नये, यासाठी आम्ही हा उपक्रम यापुढेही राबवणार आहे. दोन वर्षाच्या मुलांपासून तर अगदी सत्तरीतील सगळे कुटे कुटुंबिय यानिमित्त एकत्र आले. त्यामुळे सगळे आनंदात होते.
...
 
 

https://developers.facebook.com/docs/plugins/embedded-posts/?prefill_hre...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख