धक्कादायक...118 प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांना कोरोना संसर्ग ! - 118 Police sub Inspector cadet found corona Infected | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक...118 प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांना कोरोना संसर्ग !

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

येथील महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीत प्रशिक्षण घेत असलेले 167 पोलिस उपनिरीक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. येथे 894 प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक प्रशिक्षण आहेत. त्या सर्वांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात 167 जणांच्या चाचण्या पॉझिटीव्ह आल्या. यामध्ये 118 प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक आहेत.

नाशिक : येथील महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीत प्रशिक्षण घेत असलेले 167 पोलिस उपनिरीक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. येथे 894 प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक प्रशिक्षण आहेत. त्या सर्वांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात 167 जणांच्या चाचण्या पॉझिटीव्ह आल्या. यामध्ये 118 प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक आहेत.

जिल्हा प्रशासनातर्फे गेल्या दोन दिवसांपासून प्रशिक्षणार्थींचे स्वॅब घेण्याचे काम सुरु होते. त्यात हा धक्कादायक खुलासा झाला. महाराष्ट्र पोलिस अकादमीत राज्य लोकसेवा आयोगातर्फे निवड झालेल्या पोलिस उपनिरीक्षकांना प्रसिक्षणासाठी ठेवले जाते. त्यात राज्याच्या विविध भागातील प्रशिक्षणार्थी आहेत. त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना सरु केल्या आहेत. या प्रशिक्षणार्थींना क्वारंटाईन करुन तातडीने त्यांच्यावर उफचार सुरु करण्यात आल्याचे कळते. यासंदर्भात अकादमीच्या प्रशासनाशी संपर्क केला असता माहिती मिळू शकली नाही. उपनिरीक्षकांना सुमारे एक वर्षांचे मैदानी तसेच प्रशासकीय प्रशिक्षण दिले जाते. त्याचे वेळापत्रक अतिसय काटेकोरपणे पाळले जाते. यातील प्रशिक्षणार्थी बाधीत झाल्याने प्रशिक्षणाच्या कार्यक्रमावर परिणाम होऊ नये याची काळजी घेतली जात आहे.

...

https://developers.facebook.com/docs/plugins/embedded-posts/?prefill_hre...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख