शासनाचे आदेश...शंभर कोटींच्या `टीडीआर` घोटाळ्याची होणार चौकशी 

महापालिकेतील देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक २९५ मधील आरक्षित जागा ताब्यात घेताना मोठा घोटाळा झाला आहे. हा महापालिकेतील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे बोलले जाते. राज्य शासनाने आता त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
शासनाचे आदेश...शंभर कोटींच्या `टीडीआर` घोटाळ्याची होणार चौकशी 

नाशिक : महापालिकेतील देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक २९५ मधील आरक्षित जागा ताब्यात घेताना मोठा घोटाळा झाला आहे. हा महापालिकेतील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे बोलले जाते. राज्य शासनाने आता त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.  

राज्य शासनाकडे भरलेला नजराणा व स्टॅम्प ड्यूटी व प्रत्यक्षात आरक्षित जागेचा सुमारे २५ हजारांचा टीडीआर महापालिकेकडून वसूल करण्यात आला. यात शंभर कोटींचा घोटाळा झाला. या प्रकरणी नगरविकास विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनातील काही अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.  त्याचबरोबर रेल्वेसाठी जमीन संपादित करताना महापालिकेने संबंधित जागामालकांना टीडीआर दिला. त्या संदर्भातही चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे टीडीआर घोटाळ्याची पोलखोल होण्याची शक्यता आहे. 

गेले तीन वर्षे हा घोटाळा सातत्याने चर्चेत आहे. त्याबाबत शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी या संदर्भात चौकशी करावी, असे पत्र शासनाला तीन महिन्यांपूर्वी दिले होते. त्याव्यतिरिक्त ॲड. शिवाजी सहाणे व मनसेचे नगरसेवक सलीम शेख यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. 

शहरातील सिन्नर फाटा भागातील सर्व्हे क्रमांक २९५/१ मधील आरक्षण क्रमांक २२० व २२१ या जागेचा टीडीआर देताना हा गैरव्यवहार झाला. पंधरा हजार ६३० चौरसमीटर क्षेत्राचा टीडीआर देताना जागा बदल दर्शवून अधिक किमतीचा टीडीआर देण्यात आला. सिन्नर फाटा येथे आरक्षित जागा असताना नाशिक रोडच्या बिटको चौक ते उड्डाणपुलापर्यंत जागा दर्शविण्यात आली. मूळ मालकांनी आरक्षित जागा मोफत देण्याचे लिहून दिले असताना टीडीआर दिला गेला. महापालिकेने संबंधित जागामालकांना जागेचा सरकारी बाजारभाव सहा हजार ९०० रुपये प्रतिचौरसमीटर असताना २५ हजार १०० प्रतिचौरसमीटर दर दर्शविण्यात आला. यात बाजार भावाशी तुलना करता महापालिकेला ७५ कोटींचा भुर्दंड बसला. माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २०१८ मध्ये चुकीच्या पद्धतीने टीडीआर देण्यात आल्याचा संशय व्यक्त केला होता. या संदर्भात नगरसेवक बडगुजर यांनी शासनाला पत्र दिल्यानंतर  चौकशीचे आदेश दिले. 
...
महापालिकेचे प्रशासन टीडीआर घेतलेल्या जागामालकांना पाठीशी घालत आहेत. ज्यांनी घोटाळा केला त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे. 
-सुधाकर बडगुजर, नगरसेवक 
...
तीन वर्षांपासून प्रकरणाची चर्चा सुरू असताना महापालिकेकडून दखल घेतली गेली नाही. या प्रकरणाच्या चौकशी समितीने अहवाल दडवून ठेवला. 
-ॲड. शिवाजी सहाणे, याचिकाकर्ते 
...
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=ae86FeiIZH8AX_q-82h&_nc_ht=scontent-sin6-2.xx&oh=ae5dbb7f6f9195173bebabca908cca27&oe=5F8FE6A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com