शंभरीचे जनुभाऊ आहेर म्हणाले, राजकारणात निष्ठा हवीच! - 100 years Aher says there shaal loyality in Pokitics | Politics Marathi News - Sarkarnama

शंभरीचे जनुभाऊ आहेर म्हणाले, राजकारणात निष्ठा हवीच!

मोठाभाऊ पगार
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

पूर्वाश्रमीच्या चांदवड - देवळा मतदारसंघाचे आमदार जनुभाऊ आहेर यांनी नुकतीट वयाची शंभरी गाठली. जनमाणसाशी नाळ जोडलेले अन्‌ सामान्यांसाठी धाऊन जाणारे जुन्या पिढीतील संस्कारशील नेतृत्व म्हणून त्यांचे अग्रक्रमाने नाव घेतले जाते.

देवळा :  पूर्वाश्रमीच्या चांदवड - देवळा मतदारसंघाचे आमदार जनुभाऊ आहेर यांनी नुकतीच वयाची शंभरी गाठली. जनमाणसाशी नाळ जोडलेले अन्‌ सामान्यांसाठी धाऊन जाणारे जुन्या पिढीतील संस्कारशील नेतृत्व म्हणून त्यांचे अग्रक्रमाने नाव घेतले जाते. त्यामुळे त्यांच्या शतकी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. 

यावेळी जनुभाऊ आहेर यांच्या कन्या प्रा. अरुणा खैरनार यांनी त्यांची वाटचाल, सामाजिक, राजकीय योगदान यावर आधारीत "कर्मयोगी योद्धा' हा काव्यसंग्रह आणि "अरुणोदय' हे पुस्तक प्रकाशीत केले. नार-पार प्रकल्प, मांजरपाडा, सुळे-पिंपळे, या प्रकल्पांसह पाणीप्रश्नांवर जनुभाऊंचा गाढा अभ्यास आहे. तत्कालीन मुख्यमंत्री (कै) शंकरराव चव्हाण, शरद पवार यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. वर्तमानकाळातील पक्षाविषयी निष्ठा नसणाऱ्य राजकारणाविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. आप्तस्वकीय व राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांच्या सत्काराने भारावलेल्या आहेर यांनीही यावेळी मन मोकळ केले. ते म्हणाले, आजवरच्या वाटचालीत मला अनेकांचे सहकार्य, प्रेम आणि विश्‍वास मिळाला. या शिदोरीच्या जोरावरच सामान्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी मला सदैव उर्जा मिळाली. प्रेमाची ही उर्जा हेच माझे बळ आहे. त्या जोरावरच मी वयाचे शतक गाठले आहे. 

ते म्हणाले, आताच्या निवडणुकीत मतांसाठी पैसे वाटावे लागतात, अशी चर्चा कानावर येत असते. परंतु आमच्या कार्यकाळात मतदाराला प्रलोभने दिली जात नव्हती. प्रामाणिक उमेदवाराला निवडणूक निधी म्हणून जनताच पैसा गोळा करून द्यायची. मी सुद्धा अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असतांना जनतेने निधी गोळा करून दिला होता. अशा अनेक आठवणी त्यांनी जागवल्या. 

यावेळी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील, माजी आमदार शांताराम तात्या आहेर, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, उपसभापती राघोनाना आहिरे, संचालक डॉ. विश्राम निकम, प्राचार्य हितेंद्र आहेर, अरुण खैरनार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते पंडितराव निकम, गंगाधर शिरसाठ, मधुकर मेतकर, माजी नगरसेवक उमेश आहेर, सुशांत खैरनार, विजय आहेर आदींनी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. 
... 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख