100 percent Tribal Peth, Surgana had no covid 19 patient | Sarkarnama

आदिवासींनी असे काय केले, की पेठ, सुरगाण्यात कोरोनाचा रुग्ण नाही!

संपत देवगिरे
बुधवार, 1 जुलै 2020

दिलासादायक म्हणजे पेठ, सुरगाणा या दोन आदिवासी तालुक्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. त्याचे कारण म्हणजे या नागरीकांनी आपल्या गावात केलेली नो एंट्री. त्यांचा हा उपाय रामबाण ठरला आहे. 

नाशिक : शहरातील अतीउत्साही, सो कॅाल्ड शिक्षीत समाजाने इतरांना भरपुर उपदेश दिले. मात्र आज असा एकही भाग नाही जीथे कोरोना पोहोचला नाही. अगदी नाशिक शहरातही मोठ्या प्रमाणात कोरोचा संसर्ग सुरु आहे. प्रशासन त्रस्त आहे. मात्र दिलासादायक म्हणजे पेठ, सुरगाणा या दोन आदिवासी तालुक्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. त्याचे कारण म्हणजे या नागरीकांनी आपल्या गावात केलेली नो एंट्री. त्यांचा हा उपाय रामबाण ठरला आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ हजार ३४०  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला.  सद्यस्थितीत १ हजार ६९२  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत २३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक ८१, चांदवड १, सिन्नर ५०, दिंडोरी २४, निफाड ५४, देवळा १३,  नांदगांव ८,येवला ३६, त्र्यंबकेश्वर १८, बागलाण १५, कळवण २, इगतपुरी २५, मालेगांव ग्रामीण १६ असे एकूण  ३४३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून सुरगाणा, पेठ, या दोन तालुक्यात एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण नाही. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार १४६ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १५० तर जिल्ह्याबाहेरील ५३  असे एकूण १ हजार ६९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ४ हजार २७० रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीण ४७ ,नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १०५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ७५ व जिल्हा बाहेरील ११  अशा एकूण २३८  रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 

या स्थितीत देखील पेठ, सुरगाणा या शंभर टक्के आदिवासी तालुक्यात अद्याप कोरोनाचा संसर्ग होऊ शकला नाही. या भागातील हजारो लोक रोजगारासाठी शहरात जातात. त्यांचे मोठ्या प्रामणात स्थलांतर होते. मात्र जेव्हा अन्य भागात व शहरात कोरोनामुळे रोजगार बंद झाला, तेव्हा ते गावी परतले. तेव्हा या लोकांनी स्वतःचे विलगीकरण केले. त्यांना अन्य लोकांनी दबाव आणून तसे करण्यास भाग पाडले. शिवाय गावात येणारे रस्ते झाडे तोडून बंद केले. बाहेरच्या कोणत्याही नागरीकांना येथे प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे कोणी गावाच्या बाहेर जाणार नाही, बाहेरच्यांना गावात प्रवेश नाही. त्यांचा हा उपाय रामबाण ठरला. त्यामुळे त्यांनी कोरोनापासून स्वतःचा यशस्वी बचाव केला. शहरातील नागरीकांनीही त्यांचा आदर्श घेण्याजोगा आहे. तसे केले तर कोरोना निश्चितच नियंत्रणात येईल.
....
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख