दहा लाखांपर्यंतची कामे आता मजूर संस्थांना देणार

विविध राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या मजूर संस्थांच्या अडचणी आता दुर होणार आहेत. येथील नाशिक व मालेगाव महापालिकेने दहा लाखांपर्यंतची कामे ई निविदांशिवाय या संस्थांना देण्यास संमती दर्शवली आहे.
Labour Societies
Labour Societies

नाशिक : विविध राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या मजूर संस्थांच्या अडचणी आता दुर होणार आहेत. (10 lacs works will alloted to labour societyis without e tender) येथील नाशिक व मालेगाव महापालिकेने दहा लाखांपर्यंतची कामे ई निविदांशिवाय या संस्थांना देण्यास संमती दर्शवली (NMC given positive response) आहे.

यासंदर्भात मालेगाव महापालिकेची दहा लाखांपर्यंतची कामे मजूर संस्थांना द्यावीत यासाठी जिल्हा मजूर संघाचे पदाधिकारी पाठपुरावा करीत होते. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मजीर फेडरेशनचे संचालक राजेंद्र भोसले यांनी नुकतीच मालेगाव महापालिकेच्या महापौर ताहेरा शेख तसेच आयुक्तांची यांची भेट घेऊन चर्चा केली. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने यासंदर्भात राज्यातील महापालिकांना त्याबाबत सूचना केल्या होत्या. नगरविकास विभागाच्या ८ जुलै २०२१ रोजी काढलेल्या शासकीय निर्णयानुसार दहा लाखांच्या पुढील कामांसाठी ई निविदा प्रक्रीया राबवावी. उर्वरीत कामे त्यातून वगळावीत. या सूचना राज्यातील सर्व नगरपालिकांना देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दहा लाखांपर्यंतची कामे शासकीय सवलतीनुसार मजूर संस्थांना ई निविदांशिवाय कामवाटप समितीमार्फत देण्यात यावीत. त्याबाबत श्री. भोसले, उपमहापौर निलेश आहेर व संस्थांच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले. 

यासंदर्भात गेल्या आठवड्यात जिल्हा मजूर फेडरेशनचे पदाधिकारी, संचालकांनी नाशिक महापालिका प्रशासनाशी चर्चा केली होती. श्री. भोसले तसेच नगरसेवक योगेश (मुन्ना) हिरे, अध्यक्ष दिनकर उगले आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी त्याबाबत महापालिका आयुक्त व महापौरांशी चर्चा केली होती. या निर्णयाने राज्यभरातील मजूर संस्थांना दिलासा मिळणार आहे. ही सहकारातील एक मोठी संघटीत चळवळ असल्याने त्यातून सुशिक्षीत बेरोजगार तसेच लहान संस्थांना दिलासा मिळणार आहे.
....      

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com