सार्वजनिक जीवनात राहिलेले काम पूर्णत्वासाठी लवकरच येईन: सुरेशदादा जैन - Sureshdada Jain gave message to Party Workers | Politics Marathi News - Sarkarnama

सार्वजनिक जीवनात राहिलेले काम पूर्णत्वासाठी लवकरच येईन: सुरेशदादा जैन

कैलास शिंदे
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा काल (ता.२२) वाढदिवस होता. त्या निमित्ताने त्यांच्या समर्थकांनी सोशल मिडीयावर त्यांचे अभिनंदन करणारे संदेश पाठविले होते. या शिवाय काही जणांनी वैयक्तीक स्वरूपत त्यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

जळगाव  : सार्वजनिक जीवनात  जनतेसाठी काही काम करण्याचे राहिले आहे, ते करण्यासाठी आपण  लवकरच येणार आहोत असे प्रतिपादन माजी मंत्री व शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांनी  केले आहे. वाढदिवसानिमित्त जनतेला सोशल मिडीयावर दिलेल्या संदेशात त्यांनी म्हटले आहे.गेल्या अनेक दिवसानंतर त्यांचा जनतेसाठी व त्यांचया समर्थकांसाठी संदेश त्यांनी दिला आहे.

शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा काल (ता.२२) वाढदिवस होता. त्या निमित्ताने त्यांच्या समर्थकांनी सोशल मिडीयावर त्यांचे अभिनंदन करणारे संदेश पाठविले होते. या शिवाय काही जणांनी वैयक्तीक स्वरूपत त्यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

सुरेशदादा जैन हे तब्बतीच्या कारणामुळे मुंबई येथे आपल्या निवासस्थानी आहेत. गेल्या काही वर्षापासून त्यांचा राजकीय तसेच सार्वजनिक जीवनात कोणताही सहभाग नाही.  मात्र महापालिकेत आजही त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे १६ नगरसेवक कार्य करीत आहेत.  सार्वजनिक जीवनात कोणत्याही व्यासपीठावर उपस्थितीत दिली नाही. राजकीय व सार्वजनिक जीवनात सक्रिय असतांना त्यांचा वाढदिवस अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा केला जात होता. मात्र आताही त्यांच्या समर्थकांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमानी साजरा केला. सोशल मिडीयाच्या माध्यमतून मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या.

आपल्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या सुरेशदादा जैन यांनी जनतेला सोशल मिडीयावर संदेशही दिला आहे. ''माझ्यावर प्रेम करणारे बंधू आणि मित्रानो वाढदिवसानिमित्ताने दिवस भर फोनवर ज्या काही आर्शिवाद,शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी आभारी आहे. दिवसभर माझ्या चार पाच फोनवर शुभेच्छा देणारे मेसेज येत होते. त्या संदेशामुळे मला खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळाली आहे.आपल्या याच शुभेच्छा मल ा  पुन्हा आपल्यात व सार्वजनिक जीवनात येवून जे काही थोडे काम बाकी आहे. ते  काम करण्याची शक्ती देतील.हीच अपेक्षा आहे,'' असे त्यांनी म्हटले आहे.

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी आपल्या पुढील सार्वजनिक जीवनाबाबत कोणतेही भाष्य केले नव्हते, त्यामुळे त्यांचे समर्थक संभ्रमात होते. मात्र त्यांनी आपल्या या छोट्याशा व्हीडीओ संदेशाच्या माध्यमातून आपण पुन्हा सार्वजनिक जीवनात काम करण्यासाठी येणार असल्याचा संदेश दिला आहे, त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख