आमदार राहूल आहेरांच्या प्रयत्नांनी तीन रुग्णांना नवे जीवन!

नाशिकच्या शताब्दी मल्टी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आपल्या नात्यातील महिलेला ब्रेनडेड घोषीत केल्यावर आमदार डॅा राहूल आहेर यांच्या पुढाकाराने अवदवदानाचा निर्णय झाला. त्यातून एकाला दृष्टी तर एकाला जीवनाद मिळाले.
Rahul Aher
Rahul Aher

नाशिक : जवळच्या नातेवाईक शेवटच्या घटका मोजत असतांना बुहतांशी आप्तस्वकीयांची मनस्थिती, मनाची घालमेल काय असते याला शब्दच नसतात. मात्र नाशिकच्या शताब्दी मल्टी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आपल्या नात्यातील महिलेला ब्रेनडेड घोषीत केल्यावर आमदार डॅा राहूल आहेर यांच्या पुढाकाराने अवदवदानाचा निर्णय झाला. त्यातून एकाला दृष्टी तर एकाला जीवनाद मिळाले.

डॅा. आहेर वैद्यकीय तज्ञ आहेत. शहरात शताब्दी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे ते संचालक आहेत. याच रुग्णालयातील आपले एक जवळच्या नातेवाईक महिला नातेवाईक ब्रेनडेड झाल्या. तेव्हा त्यांनी दुःख बाजुला सारत अन्य नातेवाईकांशी चर्चा केली आपला वैद्यकीय अनुभव पणाला लावला. नातेवाईकांचा रुग्णाचे अवयवदान करण्यासाठी होकार मिळवला. त्यातून या ब्रेनडेड महिला रुग्णाचे यकृत पुण्याच्या झेडटीसीसी रुग्णालयातील रुग्णास यकृत देण्यात आले. त्यासाठी नाशिक ते पुणे असा स्पेशल काॅरिडोअर तयार करण्यात आला होता. नाशिकच्याच दोन रुग्णालयांतील एका रुग्णाल डोळे व एकास त्वचा देण्यात  करण्यात आली. यानिमित्ताने ब्रेनडेड महिलेच्या निधनानंतर देखील एका व्यक्तीला नवी दृष्टी, एकाला जीवनदान तर एकाली नवे आयुष्य प्राप्त झाले. या निरर्णयासाठी शताब्दी रुग्णालयाचे संचालक डॅा धनंजय कदम, डॅा ज्ञानेश्वर थोरात, तसेच डॅा. सोनिया फऱताळे, डॅा वैभव फरताळे, डॅा रचना फऱताळे यांचेही सहकार्य मिळाले. 

<iframe src="https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2FSarkarnamaNews%2Fposts%2F1509941582548787&width=350&show_text=true&height=380&appId" width="350" height="380" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowfullscreen="true" allow="autoplay; clipboard-write; encrypted-media; picture-in-picture; web-share"></iframe>

अवयवदानाचा निर्णय झाल्यावर शहरातील ऋषिकेश हॉस्पिटलचे अवयवदान समुपदेशक डॉ. संजय रकिबे व संचालक डॉ. भाऊसाहेब मोरे यांचाशी संपर्क साधून मेंदूमृत रुग्णाला ऋषिकेश हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. ऋषिकेश हॉस्पिटलच्या ब्रेन डेथ कमिटीने मेंदूमृत घोषित केल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णाचे शक्य ते सर्व अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुणे ZTCC ला कळविल्यानंतर रुग्णाचे लिव्हर नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटल येथे एका गरजू रुग्णास दिले गेले. मेंदूमृत रुग्णाचे यकृत (लिव्हर) नाशिकच्याच सह्याद्री रुग्णालयात प्रत्यारोपण करण्यात आले. यामध्ये आमदार डॅा आहेर यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद व चर्चेचा विषय ठरला. 
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com