भाजपने खडसे समर्थकांना चुचकारले अन्‌ कार्यकारिणीत स्थान दिले  - Khadse supporters included in Jalgaon district BJP executive | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

भाजपने खडसे समर्थकांना चुचकारले अन्‌ कार्यकारिणीत स्थान दिले 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

तेव्हापासून नवीन कार्यकारिणीची प्रतीक्षा होती.

जळगाव : जिल्हाध्यक्ष बदलल्यापासून प्रतीक्षेत असलेली भाजपची जळगाव जिल्हा कार्यकारिणी गुरुवारी (ता. 11 फेब्रुवारी) जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांनी जाहीर झाली. उपाध्यक्षांसह सरचिटणीस व चिटणीसांचा त्यात समावेश आहे.

नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनाही भाजपने जिल्हा कार्यकारिणीत आवर्जून स्थान दिल्याचे दिसून येत आहे. भाजप सोडून जाऊ नये, यासाठी खडसे समर्थकांना चुचकारत जळगाव जिल्ह्याच्या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. 

हरिभाऊ जावळे यांच्या निधनानंतर आमदार सुरेश भोळे यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष बदलानंतर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त होते, तेव्हापासून नवीन कार्यकारिणीची प्रतीक्षा होती.

अखेर गुरुवारी ही बहुप्रतीक्षित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये बारा उपाध्यक्ष, तीन सरचिटणीस, अकरा चिटणीसांचा समावेश आहे. या कार्यकारिणीचे वैशिष्ट्ये म्हणजे पक्ष सोडून गेलेल्या खडसे समर्थकांची लागलेली वर्णी. त्यांनी पक्ष सोडून जाऊ नये, यासाठी त्यांना भाजपकडून पदाचे आमिष दाखवण्यात आल्याचे राजकीय वर्तुळातून सांगण्यात येत आहे. 

कार्यकारिणीत 12 उपाध्यक्ष 

कार्यकारिणीत अध्यक्ष सुरेश भोळे यांच्यासह पी. सी. पाटील (धरणगाव), पद्माकर महाजन (रावेर), राकेश पाटील (वडगाव, ता. चोपडा), डी. एस. चव्हाण (मुक्ताईनगर), अजय भोळे (भुसावळ), के. बी. साळुंखे (चाळीसगाव), कांचन फालक (डांभुर्णी, यावल), महेश पाटील (अमळनेर), नंदकिशोर महाजन (तांदलवाडी, यावल), रेखा चौधरी (पारोळा), भरत महाजन (फैजपूर), डॉ. विजय धांडे (रोझोदा, रावेर) यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. 

सचिन पानपाटील (कासोदा, एरंडोल), मधुकर काटे (पाचोरा), हर्षल पाटील (यावल) हे सरचिटणीस असतील. चिटणीस म्हणून नवलसिंग राजपूत (जामनेर), कविता महाजन (जळगाव ग्रामीण), सविता भालेराव (वड्री, यावल), ऍड. प्रशांत पालवे (चाळीसगाव), राजेंद्र चौधरी (टाकडी, भुसावळ), संतोष खोरखोडे (मुक्ताईनगर), रंजना नेवे (चोपडा), रवींद्र पाटील (पारोळा), मेघा जोशी (भुसावळ), सोमनाथ पाटील (भडगाव), शैलजा चौधरी (भुसावळ) यांचा समावेश आहे. अनिल खंडेलवाल (बोदवड) यांची कोशाध्यक्षपदी तर गणेश माळी (रावेर) हे कार्यालयीन मंत्री असतील. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख