राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारींनी केले एकनाथ खडसेंचे अभिनंदन! 

आपणास सुयश चिंतितो.
Governor Bhagat Singh Koshyari congratulated Eknath Khadse
Governor Bhagat Singh Koshyari congratulated Eknath Khadse

जळगाव : महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेतील नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या एकनाथ खडसे यांच्यासह अन्य नावांच्या यादीला राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी मंजुरी देता की नाही? याबाबत साशंकता असतानाच कोश्‍यारींनी खडसेंचे विधानसभेतील योगदान, तसेच समाजसेवेबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच, खडसेंना यशाच्या सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. 

अर्थात, त्यासाठी निमित्त ठरले प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी लिहिलेले "जनसेवेचा मानबिंदू : एकनाथराव खडसे' हे पुस्तक. प्रा. नेवे यांनी खडसे यांची एकूणच कार्यपद्धती, जनसंपर्क, त्यांची वक्तृत्वशैली, केलेली विकासकामे यावर संशोधन करून त्यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारे पुस्तक लिहिले आहे. सप्टेंबरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, हरिभाऊ बागडे आदींच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. 

राज्यपालांना पुस्तक पाठविले 
एकनाथ खडसे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना पुस्तकाची प्रत अवलोकनार्थ पाठविली होती. कोश्‍यारी यांनी या पुस्तकावर तातडीने आपला अभिप्राय लिहून पाठविला आहे. या अभिप्रायातून कोश्‍यारी यांनी खडसे यांच्या राजकीय, सामाजिक व सांसदीय कारकीर्दीचे कौतुक केले आहे. 

कोश्‍यारी यांचा अभिप्राय असा 
पुस्तकाच्या माध्यमातून आपले व्यक्तिमत्व, समाजकारण, राजकारण, संसदीय कार्य, वैचारिक भूमिका तसेच विधानसभा सदस्य म्हणून योगदान यासह आपल्या व्यापक सेवा कार्याचा अभ्यासपूर्ण आलेख मांडला आहे. यानिमित्त मी आपले हार्दिक अभिनंदन करतो व आपणास सुयश चिंतितो. लेखक डॉ. सुनील नेवे यांनी अभ्यासपूर्ण संशोधन करून लिहिलेला हा ग्रंथ संग्रहीत ठेवावा, असा झाला आहे, त्याबद्दल त्यांचेदेखील मी अभिनंदन करतो. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com