डाॅ. राजेंद्र फडके : मध्यप्रदेशातील भाजपच्या विजयामागचा खानदेशी चेहेरा

मध्यप्रदेशात विधानसभेच्या २७ मतदारसंघांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने विशेष यश मिळवत १९ जागा जिंकल्या. जळगाव जिल्ह्याला लागून असलेल्या नेपानगर मतदारसंघात भाजप उमेदवार सुमित्रा कासडेकर यांनी २६ हजार मतांची आघाडी घेत विजय मिळविला. यात निवडणुकीचे समन्वयक म्हणून डॉ. राजेंद्र फडके यांचे सूक्ष्म नियोजन महत्त्वपूर्ण ठरले.
Dr. Rajendra Phadke BJP
Dr. Rajendra Phadke BJP

रावेर  : मध्यप्रदेशात विधानसभेच्या २७ मतदारसंघांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने विशेष यश मिळवत १९ जागा जिंकल्या. जळगाव जिल्ह्याला लागून असलेल्या नेपानगर मतदारसंघात भाजप उमेदवार सुमित्रा कासडेकर यांनी २६ हजार मतांची आघाडी घेत विजय मिळविला. यात निवडणुकीचे समन्वयक म्हणून डॉ. राजेंद्र फडके यांचे सूक्ष्म नियोजन महत्त्वपूर्ण ठरले.

२०१८च्या विधानसभा निवडणुकीत श्रीमती कासडेकर काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाल्या होत्या. भाजप सरकारला पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला व यावेळी भाजपकडून निवडणूक लढवली. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी केंद्रीय आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेश राज्याच्या पक्षनेत्यांनी डॉ. राजेंद्र फडके यांच्याकडे मतदारसंघाचे समन्वयक म्हणून सोपवली होती. दिली.

फडके भाजपचे पूर्ण वेळ कार्यकर्ते असून जिल्हा मंत्री, उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री व प्रांत सहसंघटनमंत्री असा आलेख आहे. त्यांनी गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आसाम, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यांत भाजपची निवडणूक यंत्रणा कौशल्याने हाताळली. त्यांचा फोन सतत सुरू असतो. स्वीच ऑफ नसतोच. हे ऐकावे लागत नाही. कुणाचाही फोन केव्हाही आला तरी ते घेतातच. फोनप्रमाणेच त्यांचा प्रवासही सतत सुरू असतो. रेल्वेचा डबा हेच माझे घर असे रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी म्हणत असत. त्यांचेच डॉ. अनुयायी. पक्षसंघटनेत सर्व लहान-मोठ्या कार्यकर्त्यांचा मान राखत त्यांना कार्यप्रवण करणे, प्रत्येकाच्या कौशल्याचा वापर करून पक्षवाढ करण्यात त्यांचा हातखंडा आहे. डाॅ. फडके  बेटी बचाओ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक आहेत.

निवडणुकीचे मॅनेजमेंट
कॉंग्रेसमधून भाजपत घेतल्यानंतर त्यांनाच उमेदवारी मिळाल्याने खरेतर भाजपत काही प्रमाणात नाराजी होती. त्यामुळे श्रीमती कासडेकर यांना मोठ्या फरकाने निवडून आणणे एक आव्हानच होते. त्या पाश्‍र्वभूमीवर डॉ. फडके यांनी पहिल्या दोन दिवसात मतदारसंघाच्या परिस्थितीचा आढावा घेतला घेतला. भौगौलिकदृष्ट्या मतदारसंघाचे पाच भाग करण्यात आले. त्यातील नाराज कार्यकर्ते आणि नेते यांच्या त्यांनी व्यक्तिगत भेटी घेतल्या. प्रचार, सभा, मतदान प्रक्रिया याचे नियोजन केले. आणि मतदारसंघ विजयाच्या दिशेने सुरक्षित केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून लढताना १२०० मतांनी निवडून आलेल्या श्रीमती कासडेकर यांनी यावेळी भाजपच्या उमेदवारीवर २६ हजारांचे मताधिक्य घेतले, यावरुन या मतदारसंघातले नियोजन फलदायी ठरल्याचे दिसून येते.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, ज्येष्ठ नेते सुहास भगत, खासदार नंदकुमारसिंह चौहान, माजी मंत्री अर्चना चिटणीस, मंजुश्री दादू यांच्यासह मंडळ प्रमुख, सेक्टर प्रभारी, सर्व बूथ टीम आणि जळगाव जिल्ह्यातून प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचे हे फलित आहे.
- डॉ. राजेंद्र फडके

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com