भुजबळांनी अधिकाऱ्यांना खडसावले...म्हणाले मलमपट्टी नको, प्रत्यक्ष काम दाखवा!

काल छगनभुजबळ यांनी येवल्याला तातडीचा दौरा करुन बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. "तुम्ही करता तरी काय?. मला मलमपट्टी नको, निष्कर्ष हवा आहे. घरोघर जा आणि तपासणी करा'' अशासूचना त्यांनी दिल्या.
Chagan Bhujbal Took meeting of officers to curb Corona in Yeola
Chagan Bhujbal Took meeting of officers to curb Corona in Yeola

येवला : नियंत्रणात येऊ लागलेल्या कोरोनाने, गेल्या आठवडाभरात पुन्हा उसळी खाल्ली आहे. विशेष म्हणजे, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात कोरोनाने पुन्हा उचल खाल्ली आहे. रोज नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली.

या पार्श्‍वभूमीवर काल श्री. भुजबळ यांनी येवल्याला तातडीचा दौरा करुन बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. "तुम्ही करता तरी काय? मला मलमपट्टी नको, निष्कर्ष हवा आहे. घरोघर जा आणि तपासणी करा'' अशा सूचना त्यांनी दिल्या. 

येवल्यात वाढती रुग्ण संख्या बघता तपासणी पथके करून तातडीने 'डोअर टू डोअर' स्क्रिनिंग करण्यात यावे. सर्व्हे करताना त्रुटी राहू नये. त्यासाठी दक्षतेने काम करा. या तपासणीतून प्रत्यक्ष निष्कर्ष द्या अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश श्री. भुजबळ यांनी यावेळी दिले. 

घरोघरी जाऊन तपासणी करा

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या परिस्थितीत लोक आपल्यापर्यंत येण्याअगोदरच त्यांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात यावी. तपासणीची संख्या वाढविण्यात यावी. त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाला प्रशिक्षण, पुरेसे सॅनीटायझर, हातमौजे यांसह आवश्‍यक साहित्याचा पुरवठा करावा. 'लो रिस्क' आणि 'हाय रिस्क' रुग्णांचे अहवाल येईपर्यंत त्यांना होम क्कवारंटाईन करण्याऐवजी त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. 

यापूर्वी येवला शहरातच कोरोनाबाधीत रुग्ण आढळले होते. त्यांचे मालेगाव कनेक्‍शन होते. त्यानंतर वैद्यकीय पथकाने केलेल्या उपाययोजनांनतर संसर्ग नियंत्रणात आला होता. मात्र, सध्या शहरासह तालुक्‍याच्या अन्य भागातही कोरोना हातपाय पसरु लागला आहे. जिल्हा प्रशासनाच्या अहवालात गेल्या आठवड्याभरात येवल्याच्या ग्रामीण बागात रुग्ण आढळत आहे. त्यामुळे नागरीकांनी यांसदर्भात पालकमंत्र्यांकडे तक्रार केली होती.

गर्दी टाळण्यासाठी दुकानांची वेळ वाढवा

या पार्श्‍वभूमीवर भुजबळांनी अधिकाऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यासाठी जिल्हास्तरीय अधिकारीही या बैठकीत सहभागी झाले होते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर येवला शहरातील स्वच्छता तसेच आवश्‍यक औषध फवारणी करण्यात यावी, असे आदेश त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले. समन्वय आणि नियोजनाचा अभाव होता कामा नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामकाजात दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शहरातील गर्दी टाळण्यासाठी दुकानांना वेळ वाढून द्यावी. यावर पोलिसांनी नियंत्रण ठेवावे अशा सूचना श्री. भुजबळ यांनी दिल्या. 

या बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपील आहेर, प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार रोहिदास वारुळे,पोलिस उपअधीक्षक समरसिंग साळवे, गटविकास अधिकारी डॉ उमेश देशमुख,येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शैलजा कृपास्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एच.आर. गायकवाड, डॉ.सूर्यवंशी, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी, सहायक निबंधक एकनाथ पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. 
... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com