दादा भुसेंच्या मौनव्रतामुळे अधिकारी-कार्यकर्त्यांची उडाली धावपळ

शहरात कोरोनाचा उद्रेक झाला. रुग्णसंख्या पाचशे दहावर गेली. हे संकट दूर होऊ दे, असे साकडे कृषीमंत्री दादा भुसे यांनी संकटमोचक हनुमानाला घातले. मालेगाव शहरावर होणारी टीका व प्रशासकीय अनास्थेबद्दल नाराजी व्यक्त करीत त्यांनी आत्मक्‍लेश व मौनव्रत पाळले.
Dada Bhuse Observed Quiescent
Dada Bhuse Observed Quiescent

मालेगाव : शहरात कोरोनाचा उद्रेक झाला. रुग्णसंख्या पाचशे दहावर गेली.  हे संकट दूर होऊ दे, असे साकडे कृषीमंत्री दादा भुसे यांनी संकटमोचक हनुमानाला घातले. मालेगाव शहरावर होणारी टीका व प्रशासकीय अनास्थेबद्दल नाराजी व्यक्त करीत त्यांनी आत्मक्‍लेश व मौनव्रत पाळले. कृषीमंत्र्यांच्या या मौनव्रतामुळे अधिकारी व कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच धावपळ झाली. 

मोसमपूल चौकातील शिवसेना संपर्क कार्यालयासमोरील हनुमान मंदिरात तब्बल तीन तासांहून अधिक वेळ ठिय्या मांडला. काहीवेळ पूजा केली. यादरम्यान श्री. भुसे उपोषणाला बसल्याची वार्ता शहरात पसरली. अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम, आयुक्त त्र्यंबक कासार, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी त्यांच्याशी चर्चा केली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांबाबत या वेळी त्यांनी नाराजी व्यक्त केली.  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांबाबत या वेळी त्यांनी कामाला अधिक गती दिली पाहिजे. अधिकाऱ्यांनी बैठकांबरोबरच उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मालेगावच्या बदनामीने झाले व्यथित

मालेगावात कोरोना विषाणू संसर्गाचा झालेला विस्फोट आणि नाशिक व धुळ्यातून येथील रुग्ण स्वीकारण्याविरोधात राजकीय पक्षांनी घेतलेली भूमिका यावर शनिवारी राजकीय पडसाद उमटले. या आधी नाशिकच्या भाजप महापौर, आमदारांनी आणि नंतर धुळ्याचे भाजप खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी मालेगावचे रुग्ण आमच्याकडे नको, अशी भूमिका घेतली. या राजकीय टिकेने मालेगावचे सगळेच नेते व्यथित झाले.  त्यापैकी काही नेत्यांनी बेधडक प्रतिक्रीया व्यक्त केली. निवेदने दिली. यामध्ये मालेगावची सगळीकडे होणारी बदनामी व प्रशासकीय अनास्थेच्या निषेधार्थ सत्ताधारी पक्षाचे नेते व कृषिमंत्री भुसे यांनी दिवसभर मौनव्रत पाळले.  

उपाययोजनांबद्दल केली नाराजी व्यक्त

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांबाबत या वेळी त्यांनी नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांनी बैठकांबरोबर उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी त्यांची दूरध्वनीवर चर्चा झाली. या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय दुसाने, बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, विद्यार्थी सेनेचे विनोद वाघ, डॉ. जतीन कापडणीस, भरत देवरे आदी मोजके कार्यकर्ते उपस्थित होते. सायंकाळी पाचच्या सुमारास मंदिरातून ते बाहेर पडले. कार्यकर्त्यांशी चर्चा करून निवासस्थानी रवाना झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com