कृषिमंत्री दादा भुसे वाढदिवशी आदिवासीच्या झोपडीत जेवले

कृषिमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी आदिवासी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतशिवारांची पाहणी करत वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. शेतकरी सोमनाथ चौरे यांच्या घरी नागलीची भाकरी व रानभाज्यांचा स्वाद घेतला. तसेच याच भागातील आदिवासी बांधवांच्या झोपडीतील खिचडीची चव चाखली.
Dada Bhuse Celebrating Birthday at Tribal Home
Dada Bhuse Celebrating Birthday at Tribal Home

मालेगाव : कृषिमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी आदिवासी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतशिवारांची पाहणी करत वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. शेतकरी सोमनाथ चौरे यांच्या घरी नागलीची भाकरी व रानभाज्यांचा स्वाद घेतला. तसेच याच भागातील आदिवासी बांधवांच्या झोपडीतील खिचडीची चव चाखली. कृषिमंत्री वाढदिवशी थेट आपल्या झोपडीत येऊन जेवतात, या प्रसंगाने बारीपाडा (जि. धुळे) येथील आदिवासी बांधवांना आभाळ ठेंगणे झाले.

शेतकऱ्यांना कृषी अवजारे वाटप कार्यक्रमासाठी कृषिमंत्री दादा भुसे बारीपाडा येथे गेले होते. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषिमंत्र्यांचा वाढदिवस असल्याचे समजल्यावर या भागातील महिलांनी आदिवासी बोलीभाषेतील गाणी म्हणत त्यांचे औक्षण केले. दुपारी दीडच्या सुमारास सोमनाथ चौरे यांच्या घरी जेवण घेतले. नागलीची भाकरी, दोन-तीन प्रकारच्या रानभाज्या, मिरचीचा ठेचा आदी पदार्थ त्यांनी आवडीने खाल्ले. 

त्यानंतर त्याच भागात आदिवासी बांधवांशी संवाद साधत असताना एका झोपडीत ते गेले. कृषिमंत्री झोपडीत आले आणि जमिनीवर बसले. कुटुंबीयांना काय करावे सुचेना. शेतीकामांची विचारपूस झाल्यानंतर त्यांनी भाजलेले हरभरे मंत्र्यांना खाण्यास दिले. तसेच खिचडी खाण्याचा आग्रह केला. तेथेही भुसे यांनी खिचडीची चव चाखली.
''आदिवासी बांधवांच्या घरातील नागलीची भाकर, रानभाज्या व खिचडीचा गोडवा शब्दात वर्णन करता येणार नाही. आयुष्यातील वाढदिवशी मिळालेला हा अमूल्य ठेवा आहे. या जेवणातील गोडवा व औक्षण करताना आदिवासी माता-भगिनींनी गायलेले गीत नेहमीच स्मरणात राहील. हार-तुऱ्यांपेक्षा हा सन्मान खूपच मोठा आहे. आदिवासी बांधवांच्या कष्टाला न्याय आणि सन्मान मिळवून दिला जाईल,'' असे यावेळी भुसे यावेळी म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com