राज्य एक, गुन्हा एक, दंड मात्र नाशिकला हजार, मुंबईला दोनशे! - Without Mask fine 1000 in Nashik, 200 at Mumbai. Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

राज्य एक, गुन्हा एक, दंड मात्र नाशिकला हजार, मुंबईला दोनशे!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

कोरोनाची दुसरी लाट टाळण्यासाठी राज्य शासनाने कंबर कसली आहे. रात्रीच्या संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. विना मास्क फिरणा-यांवर कारवाई सुरु झाली आहे. मात्र या कारवाईत दंडाची रक्कम मात्र भिन्न आहे.

नाशिक : कोरोनाची दुसरी लाट टाळण्यासाठी राज्य शासनाने कंबर कसली आहे. रात्रीच्या संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. विना मास्क फिरणा-यांवर कारवाई सुरु झाली आहे. मात्र या कारवाईत दंडाची रक्कम मात्र भिन्न आहे.

नाशिकला विनामास्क आढळलात तर हजार रुपये दंडाशिवाय सुटका नाही. मुंबईला मात्र त्यासाठी अवघे दोनशे रुपये दंड केला जात असल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी कोरोनाच्या प्रसारासंदर्भात जनतेला संबोधीत केला होता. त्यात जनतेला सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर यांसह विविध सूचना केल्या होत्या. त्यानुसार कालपासून रात्रीची संचारबंदी आणि विनामास्क फिरणारे नागरिक यांच्यावर कारवाई सुरु झाली. मात्र त्यात गोंधळ आढळतो. एक हजार रुपये दंड करण्याचे परिपत्रक अनेकांना मिळालेले नसल्याने काल नाशिक शहरात एक हजार रुपये तर सिडको भागात दोनशे रुपये दंड आकारल्याचे प्रकार घडले. हा गोंधळ राज्यातही दिसला. राज्य एक, गुन्हा एक मात्र दंडाची शिक्षा वेगळी असे चित्र आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्य असलेल्या नाशिक महापालिकेकडून एक हजार रुपये तर शिवसेनेचे राज्य असलेल्या मुंबई महापालिकेकडून दोनशे रुपये दंड आकारला जात आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय आहे.    

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक नियम कडक करण्यात आले. मात्र त्यात एकवाक्यता नसल्याचे पुढे आले आहे. मास्क न घातल्यास दंड आकारणीचे अधिकार महापालिकांना दिले आहे. त्या अधिकारांचा सोयीने वापर सुरू झाला आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेचे मास्क न वापरल्यास 200 रुपये दंड आकारला जातो. भाजपची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेत मात्र थेट 1000 रुपये म्हणजे पाच पट अधिक दंड आकारला जातो. शिवसेना आणि भाजप अशा दोन राजकीय पक्षाच्या अधिकारात दोन वेगवेगळे नियम अनुभवास मिळत आहे. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंड आकारणीचे अधिकार ज्या महापालिकांना आहे. त्यासाठी मुंबई महापालिका अधिनियम एकच आहे, असे असताना हा फरक आहेच. पण कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या तुलनेतही नाशिक शहरात मुंबईच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी आहे. नाशिकमध्ये मुंबईच्या तुलनेत पाच पट दंड आकारणी होत असल्याने तो टिकेचा विषय झाला आहे.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख