गोटे - बेडसे यांच्यातले वाद आज जयंत पाटलांच्या समोर प्रकटणार? - Will diffrence of opinion between Anil Gote and Sandip Bedase Surface again | Politics Marathi News - Sarkarnama

गोटे - बेडसे यांच्यातले वाद आज जयंत पाटलांच्या समोर प्रकटणार?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

काल प्रदेशाध्यक्षां समोरच अंतर्गत गटबाजीतून कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. तसाच वाद आज देखील शिंदखेडा येथे होणाऱ्या संवाद सभेत होण्याची दाट शक्यता असून माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे व धुळे नंदुरबार जिल्हा उपप्रदेश अध्यक्ष अनिल गोटे यांच्यातील वाद समोर येण्याची शक्यता आहे. 

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील हे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून धुळे दौऱ्यावर आहेत. परंतु काल प्रदेशाध्यक्षां समोरच अंतर्गत गटबाजीतून कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. तसाच वाद आज देखील शिंदखेडा येथे होणाऱ्या संवाद सभेत होण्याची दाट शक्यता असून माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे व धुळे नंदुरबार जिल्हा उपप्रदेश अध्यक्ष अनिल गोटे यांच्यातील वाद समोर येण्याची शक्यता आहे. 

संदीप बेडसे यांच्या कार्यकर्त्यांनी आज होणाऱ्या कार्यक्रमाचे बॅनर सोशल मीडियावर झळकवले आहेत. या बॅनर वर राष्ट्रवादीच्या मोठ्या तील मोठे व छोट्यातील छोटे कार्यकर्त्यांचा फोटो झळकवण्यात आला आहे. परंतु या बॅनरवर अनिल गोटे यांच्या फोटोला स्थान देण्यात आलेले नाही. आज अनिल गोटे व संदीप बेडसे हे शिंदखेडा येथे होणाऱ्या कार्यक्रमात समोरासमोर असणार आहेत. यामुळे आज या कार्यक्रमात देखील अंतर्गत गटबाजीचे प्रदर्शन प्रदेशाध्यक्षांना बघावयास लागणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

धुळे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने धुळे दौऱ्यावर आले असून काल व आज असे दोन दिवस ही संवाद यात्रा असल्याने जयंत पाटील हे दोन दिवस धुळे दौऱ्यावर आहेत. काल रात्री धुळे शहरात कार्यकर्त्यांशी एका कार्यक्रमांतर्गत संवाद सुरू असताना धुळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अंतर्गत गटबाजीतून वाद उफाळला होता. प्रदेश अध्यक्षांसमोरच दोन गटांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी देखील झाली. 

आज देखील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शिंदखेडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रेनिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. परंतु ज्याप्रमाणे धुळे शहरामध्ये दोन गटांमध्ये वाद उफाळला,  त्याचप्रमाणे शिंदखेडा तालुक्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष संदीप बेडसे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळे नंदुरबार प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांच्यातला वाद संपूर्ण जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट आहे. 

माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमानिमित्त बॅनर सोशल मीडियावर प्रसिद्ध केले जात आहेत. या बॅनर वरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोठ्या मोठ्या व छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांचे फोटो लावण्यात आले आहे परंतु या बॅनरवर मात्र धुळे नंदुरबार जिल्ह्याचे उपप्रदेश अध्यक्ष अनिल गोटे यांच्या फोटोला स्थान देण्यात आलेले नाही. व त्याच्या बॅनर वर संदीप बेडसे यांच्या फोटोला मात्र लक्षवेधी स्थान देण्यात आले आहे. हे बॅनर सोशल मीडिया वरती संदीप बेडसे यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात वायरल देखील केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वाढता अंतर्गत वाद बघता हे जर असेच पुढे चालू राहिले तर त्याचा फटका नक्कीच पक्षाला बसेल यात शंकाच नाही.
Edited by - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख