थोड थांबा...शिवसेना प्रवेशाची लाट येणार आहे ! - wait a little shivsena enters wave will be there | Politics Marathi News - Sarkarnama

थोड थांबा...शिवसेना प्रवेशाची लाट येणार आहे !

संपत देवगिरे
बुधवार, 6 जानेवारी 2021

शिवसेनेचे खासदार संजय राऊत गुरुवारी नाशिकला येत आहे. यावेळी विविध पक्षातील नाराज नेत्यांशी ते पडद्याआड चर्चा करतील. भाजपचे दोन मोठे नेते राऊत यांना भेटणार आहेत. त्यामुळे शिवसेनेत कोण कोण प्रवेश करणार याची उत्सुकता आहे.

नाशिक : शिवसेना नेते खसादार संजय राऊत गुरुवारी नाशिकच्या दौ-यावर येत आहेत. त्यामुळे अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करणार अशा बातम्या येत आहेत. यावरुन राऊत यांच्या दौ-याने काय काय चमत्कार होऊ शकतात याची प्रचिती येते. थोड थांबा, उत्तर महाराष्ट्रात शिवसेना प्रवेशाची लाट येणार आहे, असे नाशिकचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले. 

भारतीय जनता पक्षाचे नाशिकचे दोन मोठे नेते शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर उद्या (ता.7) शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख खासदार राऊत नाशिकचा दौरा करीत आहेत. त्यांचा हा दौरा महापालिकेच्या विविध विकासकामांच्या निमित्ताने होत आहे. या दरम्यान ते भाजपसह काही पक्षांच्या नाराज नेत्यांशी चर्चा करणार आहेत. मात्र केवळ भाजपच नव्हे तर महाविकास आघाडीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या काही नेत्यांशीही शिवसेनेने संपर्क केला आहे. त्यांनीही भेटीसाठी यावे असे प्रयत्न आहेत. हे चित्र पाहता शिवसेनेने महापालिकेची निवडणूक गांभिर्याने घेतल्याचे चित्र आहे. त्याचा सर्वाधिक धसका भाजपने घेतला आहे. शिवसेनेचा हा धक्काही भाजपलाच बसावा असे शिवसेनेचे नियोजन दिसते.

यासंदर्भात शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी म्हणाले, उद्या लगेचच कोणतेही प्रवेश होतील असे नियोजन केलेले नाही. मात्र विविध नेत्यांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे. ती प्राथमिक चर्चा असेल. थोडे थांबा, उत्तर महाराष्ट्रात अनेक नेते नाराज आहेत. त्यांना शिवसेनेत येण्याची इच्छा आहे. राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हेच महाराष्ट्राच्या हिताचे व विकासाचे आहे याची जाणीव सगळ्यांना झाली आहे. त्यामुळे सकाळ- सायंकाळ केवळ टिका करणारा भारतीय जनता पक्ष त्यांच्या पायाखाली काय जळते आहे, याकडे फार काळ दुर्लक्ष करु शकणार नाही.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख